विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांना न्यायालयाने ठोकला दंड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा बसवून, वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम सर्व प्रथम पोलीस आयुक्तांनी हाती घेतले आहे. त्यामुळेच उलट्या दिशेने वाहने चालविणाऱ्या चालकांवर थेट खटले भरण्याचे काम सुरु आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाच दिवशी चार वाहन चालकांविरोधात कारवाई करून  शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहा हजारांचा दंड ठोठावला व वाहन चालकांनी दंड न भरल्यास त्यांना एक दिवसाचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6c8ee1c4-bb49-11e8-814c-1daf51d5ff28′]

संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. वाहतूक कोंडी होणा-या चौकांमध्ये एकेरी वाहतूक, काही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांविरोधात कायदेशीर कारवाई देखील करण्यात येत आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. १७) चार जणांविरोधात भारतीय दंड विधान कलम २७९ नुसार कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकांना आज शिवाजी नगर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला.

संजय बर्वे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्‍ती

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडी पासून सुरुवात केली. ३ सप्टेंबर रोजी हिंजवडी मधील सर्वात जास्त वाहतुकी कोंडी होणा-या शिवाजी चौकात एकेरी वाहतूक सुरु केली. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेल्या या बदलाचे सकारात्मक परिणाम दिसताच त्याबाबत अंतिम आदेश काढून एकेरी चक्राकार वाहतूक करण्यात आली.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचा प्रयत्न उधळला

हिंजवडी पोलिसांनी १७ सप्टेंबर रोजी चार चालकांविरोधात खटला दाखल केला. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी २५०० रुपये दंड आणि तो न भरल्यास एक दिवसाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिली.