शरद कळसकरचा ताबा मागणारा सीबीआयचा अर्ज कोर्टाने फेटाळला

मुंबई : पोलीसनामा  ऑनलाईन  

डॉ . नरेंद्र दाभोळकर प्रकरणात अत्यंत महत्वाची माहिती पुढे आली आहे.  शरद कळसकरचा ताबा मागणारा सीबीआयचा अर्ज सेशन्स कोर्टाने फेटाळला आहे. कळसकरचा ताबा मागण्यासाठी सीबीआयने दिलेला अर्ज कायदेशीरदृष्ट्या अयोग्य असल्याचे सांगत कोर्टाने अर्ज फेटाळला आहे. दाभोळकर प्रकरणात चौकशीसाठी कळसकरचा सीबीआयला ताबा हवा होता, पण तो अर्जच कोर्टाने फेटाळल्याने सीबीआयला मोठा धक्का बसला आहे.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’35398ef9-ab5e-11e8-9d5e-01a9ad1d8894′]

शरद कळसकरला नालासोपारा स्फोटक प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतले आहे. पण त्याचे अनेक धागे-दोरे नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाशी जुळत असल्याने सीबीआयने चौकशीसाठी शरद कळसकरचा ताबा मागितला होता. पण सीबीआयच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत कोर्टाने हा अर्ज रद्द केला आहे.
 

दाभोलकर हत्याप्रकरणात आणखी दोन संशयित ताब्यात

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व जेष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी मॉर्निंग वॉक करीत असताना महर्षी वि. रा. शिंदे पुलावर मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्याकांडाचा तपास सध्या सीबीआय करीत आहे. दरम्यान, दहशतवाद विरोधी पथकाने ९ ऑगस्ट रोजी नालासोपारा येथे शस्त्रांचा साठा जप्त केला होता. यावेळी वैभव राऊत, शरद कळसकर व सुधन्वा गोंधळेकर या तिघांना अटक केली. शरद कळसकरच्या चौकशीमध्ये औरंगाबाद येथील सचिन अंदुरे या संशयिताचे नाव समोर आले. १४ ऑगस्ट रोजी सचिनला एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले होते. दोन दिवस त्याची चौकशी केल्यानंतर १६ ऑगस्टर रोजी त्याला पुन्हा एटीएसच्या पथकाने औरंगाबादला घरी आणून सोडले होते. त्यानंतर काही वेळातच सीबीआयच्या पथकाने सचिन अंदुरेला अटक करीत पुण्याला नेले.

दाभोलकर हत्या प्रकरण : श्रीकांत पांगारकरला चौकशीसाठी जालन्यात आणले

दरम्यान, पुण्यातील सनबर्न वेस्टर्न म्युझिक कॉन्सर्टमध्ये बॉम्बस्फोट घडवायचा हिंदुत्ववाद्यांचा कट होता अशी धक्कादायक माहिती समोर आलीये. तसंच बेळगावमध्ये पद्मावत सिनेमाच्या शो दरम्यान सिनेमागृहात स्फोट घडवायचा होता अशी माहिती समोर आली. नालासोपारा स्फोटक जप्ती प्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या कॉम्प्युटरमधून ही माहिती डीकोड करण्यात आल्याचे काल म्हणजे मंगळवारी एटीएसने  कोर्टासमोर सांगितले. मंगळवारी वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांना मुंबई सत्र न्यायालयाने  हजर करण्यात आले . यावेळी कोर्टाने  तिघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.