शहीद जवानांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न

भोकर :- पाेलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड) – शहीद मारोती राजेमोड यांचे १७ रोजी वीर मरण आले. त्यांचं पार्थिव २१/१०/२०१८ रोजी भोकर येथून त्यांच्या गावी नेण्यात आले व त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी आजी माजी सैनिक, पोलीस मानवंदणेत शहिद मारोती राजेमोड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पांडुरणा येथील मारोती राजेमोड यांचे प्राथमिक शिक्षण १ ली ते ७ वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडुरणा येथे झाले तर ८ वी ते १० वी माध्यमिक/हायस्कुल चे शिक्षण आश्रम शाळा मुगट येथे पूर्ण झाले परिस्थिती बेताची असली तरी घरच्या कुटुंबातील वडिलांनी त्यांचे ११ वी मध्ये भोकर येथिल नामांकित दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात प्रवेश घेतला व ११ वी ,१२ वी शिक्षण पूर्ण झाल्याने जानेवारी २००८ मध्ये ८७४ए डी रेजिमेंट ह्या सैन्य दलात दाखल झाले त्यानंतर देशसेवे मध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतले.

भारतमातेचे वीर पुत्र भारतीय लष्करात जम्मू मधील उधमपूर येथे लष्कराची सेवा बजावताना शहीद झाला अशा शहीद जवान साठी अनेक जणांचे अश्रू अनावर झाले  मौ. पांडुरणा येथील रहिवाशी श्री. मारोती कोंडीबा राजेमोड, वय 28 वर्ष (सैनिक) यांचे दि १७ रोजी निधन झाले आहे. त्यांचं पार्थिव जम्मू येथून विमानाने हैद्राबाद पर्यंत आणले व त्यानंतर त्यांचे पार्थिव भोकर येथे अंबुलेन्स द्वारे भोकर शहरात आणले त्यांची पत्नी व चिमुकली मुल ट्रेन द्वारे नियोजित वेळेत पोहचले.

प्रभावती मारोती राजेमोड ,पत्नी (वय 24 वर्ष), साईनाथ मारोती राजेमोड – मुलगा (वय 4 वर्ष),श्रावणी मारोती राजेमोड – मुलगी (वय 1.5 वर्ष)कोंडीबा नारायण राजेमोड(वडील),अनुसायबाई कोंडीबा राजेमोड (आई)जनार्धन कोंडीबा राजेमोड (भाऊ), निर्गुणा प्रशांत बत्तलवाड (बहीण) असा त्यांचा छोटासा परिवार आहे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती करता सर्व काही मारोती असल्याने कुटुंबाचे छत्र हरवल्याचे दिसून येत होते. ८७४ ए डी रेजिमेंट मारोती कोंडीबा राजेमोड यांचं पार्थिव मौ.पांडुरणा ता भोकर येथे रविवारी ११ वाजता आले.व दुपारी १२:३० वाजता हवेत गोळीबार करून शासकीय इस्मात त्यांच्यावर मुलाच्या हस्ते मुख अग्नी देऊन अंत्यसंस्कार पार पाडण्यात आला

.

रविवारी सकाळी ११ वाजता पार्थिव पांडुरणा येथे अंबुलेन्स द्वारे चोख पोलीस बंदोबस्त मध्ये त्यांच्या मूळ घरी नेण्यात आले व त्यानंतर लगेच मिरवणूक काढून त्यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले मराठवाडयातून यावेळी अंत्य दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार,पोलीस निरीक्षक,नायबतहसीलदार राजकीय पुढारी,आमदार, ग्रामसेवक,तलाठी,मंडळ अधिकारी,पत्रकार उपस्थित होते.

राजेमोड परीवारावर दुःखाचा डोंगर पसरलेला असताना त्यांच्या अनेक मित्र मंडळी कडून त्यांच्या परिवाराचे सांत्वन करणे चालू होते मारोती हा जवान देशसेवा करत असताना कर्तव्य बजावताना त्यांचा आकस्मित मृत्यू होणे म्हणजे तो जवान शहीद होणेच होय शहीद मारोती राजेमोड ह्या जवानांच्या जाण्याने पांडुरणा गावावर शोककळा पसरली. त्यांच्या चार वर्षाच्या मुलीने अग्नी दिली ते पाहून तर सर्वांच्या डोळ्यातील अश्रू निघू लागले. पार्थिव शरीरासोबत ८७४ ए डी रेजिमेंट चे अधिकारी आले होते असे यावेळी समजले
अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी महसूल प्रशासन व गावकरी यांनी मिळून केले असल्याचे माधव शिंदे (मुख्याध्यापक) यांनी सांगितले.