अशी स्मशानभूमी बनवेन की, वृद्धाला मरणाची इच्छा होईल ; ‘या’ काँग्रेस नेत्याचे खळबळजनक विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांतील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका झाल्या आहेत. प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मत मिळवण्यासाठी उमेदवार अनेक प्रलोभने देताना आपण पहिले असेल. अशातच काँग्रेसचे नेते अमरिंदर सिंह राजा वरिंग यांनी एक अजब आश्वासन जनतेला दिले आहे. या आश्वासनाच्या आधारे ते प्रचार करीत आहेत. ‘८० वर्षाच्या वृद्धाला मृत्यूची इच्छा होईल अशी स्मशानभूमी बनवेन, असे अजब गजब विधान त्यांनी केले आहे. फरीदकोट लोकसभा उमेदवाराचा प्रचार करताना ते बोलत होते.

या प्रचारादरम्यान बोलताना अमरिंदर सिंह राजा वरिंग यांनी म्हंटले आहे की, फरीदकोट मतदार संघात अकाली दलाने स्मशान भूमीवर थोडेही लक्ष दिले नाही. पण आमची सत्ता आल्यास सरकार स्मशानभूमीवर लाखो रुपये खर्च करेन. याठिकाणी आम्ही अशी स्मशानभूमी बनवू की ८० वर्षाच्या वृद्धाला लवकर मरण्याची इच्छा होईल आणि याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कर होतील.

ते एवढ्यावरच नाही थांबले नाहीत तर पुढे म्हणाले की, आमची स्मशानभूमी पाहून घरातील मुले म्हणतील की या वृद्धांचा मृत्यू का नाही होत ? त्यांनाही या स्मशानभूमीत अंत्यसंस्कर करण्यासाठी घेऊन जाता येईल, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like