‘त्या’ चिमरडूच्या मृत्यूप्रकरणी विकसकावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घोरपडे पेठेतील जोहरा कॉम्प्लेक्स इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून सात वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याप्रकरणी खडक पोलिसांनी विकसकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

नशरा रहेमान खान (7 वर्ष, रा. क्लास गार्डन सोसायटी घोरपडे पेठ) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक के. व्ही. पाडोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नसरुद्दीन शरफुद्दीन इनामदार (७१, नानापेठ) व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नशरा खान घोरपड़े पेठेतील क्लास गार्डन सोसायटीमध्ये राहण्यास होती. तर तिची आजी जोहरा कॉम्पलेक्समध्ये राहण्यास होती. ती आजीला भेटण्यासाठी २० ऑक्टोबर २०१८ रोजी गेलेली असताना कुटुंबिय घरात असताना ती खेळता खेळता बाहेर गेली. आणि इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर लिफ्टमध्ये गेली. त्यानंतर लिफ्ट सुरु झाल्याने ती लिफ्ट आणि भिंतीच्या मध्ये अडकली. बऱ्याच वेळानंतर तेथील लोकांनी तिला पाहिले.

त्यांनी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला तात्काळ तेथून काढले. त्यानंतर तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी तिचा मृत्यू झाला. यानंतर खडक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदणी करण्यात आली होती. खडक पोलिसांनी याप्रकरणी तपास केला. त्यावेळी जोरहा कॉम्पलेक्स ही इमारत जी. नवाज कन्स्ट्रक्शनच्यावतीने ती विकसित करण्यात आली. त्यावेली त्यांनी या इमारतीच्या विकसनाबाबत योग्य त्या सर्व कायदेशीर व तांत्रिक बाबींची पुर्तता न करता निष्काळजीपणा व बेजबाबदारपणाने लिफ्ट बसवली. तसेच तत्याबाबत परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे नशरा हिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी विकसकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.