सध्याचं मंत्रिमंडळ तात्पुरतं, डिसेंबरअखेर सगळं चित्र स्पष्ट होईल : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सध्याचं मंत्रिमंडळ हे काही काळापुरतं आहे. डिसेंबरअखेर मंत्रिमंडळाचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

मंत्रिमंडळाविषयी माहिती देताना अजित पवार म्हणाले की, ‘राज्य मंत्रिमंडळात एकूण मंत्र्यांची संख्या 43 इतकी असते आज मुख्यमंत्रीधरून 7 जण राज्याचा कारभार पाहत आहेत. नागपूरला होणाऱ्या आगामी हिवाळी अधिवेशनात काही प्रश्न निर्माण झाल्यास हे सहा ही जण ते सांभाळून घेऊ शकतात. कारण हे सर्वजण अनुभवी मंत्री आहेत. हे लोक संपूर्ण राज्याचा कारभार दीर्घकाळ पाहू शकत नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, कुणाकुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, याचा निर्णय तिन्ही पक्षाचे प्रमुख बैठक घेऊन निर्णय घेतील. सध्याचं मंत्रिमंडळ हे काही काळापुरतं आहे. डिसेंबरअखेर मंत्रिमंडळाचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल.’

महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्तासंघर्षाचा पेच सुटून राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकूण 6 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र या तिन्ही पक्षातील खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like