महिला उत्तराधिकारी दिसायला ‘सुंदर’ आणि ‘आकर्षक’ असली पाहिजे : तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर कोणी महिला दलाई लामा होऊ शकते तर ती आकर्षक असली पाहिजे. जर ती दिसायला सुंदर नसेल तर तिला पहायला लोक येणार नाही, असे तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांनी सांगितले. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना महिला उत्तराधिकारी विषयी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

दलाई लामा यांना वाटते की युरोपचे अफ्रिकेप्रमाणे इस्लामीकरण होऊ शकणार नाही. युरोपातील देशांनी शरणार्थीना तेथे थांबू दिले नाही पाहिजे. त्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन पुन्हा त्यांच्या देशात पाठविण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे.

अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पविषयी ते म्हणाले, ट्रम्प हे एक दिवस काही बोलतात, दुसऱ्या दिवशी दुसरेच काही बोलतात. त्यांच्यात नैतिक सिद्धांताची कमतरता आहे. ते राष्ट्रपती बनले तेव्हा अमेरिका फर्स्ट अशी त्यांनी घोषणा केली. हे चुकीचे आहे. अमेरिकेने वैश्विक जबाबदारी घेतली पाहिजे.

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार

केसांना ‘डाय’ करताय ? मग आधी हे वाचा, आणि लक्षात ठेवा

‘अ‍ॅसिडिटीचा’ त्रास टाळण्यासाठी हे उपाय करा, होईल फायदा

घरातल्या या मसाल्याने रात्रीतून पिंपल्स होईल गायब …