The Dark Shadow Motion Pictures | समर क्वीन, किंग, प्रिन्स, प्रिन्सेस सौंदर्य स्पर्धेचे आयोजन; विजय पाटकर, जयवंत वाडकर, स्मिता गोंदकर, गायक उत्कर्ष शिंदे असे अनेक दिग्गज लावणार हजेरी

पुणे : द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स (The Dark Shadow Motion Pictures) निर्मित आणि दिग्दर्शक रामकुमार शेडगे (Ramkumar Shedge) प्रस्तुत समर क्वीन किंग प्रिन्स आणि प्रिन्सेस ही सौंदर्य स्पर्धा येत्या २५ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता एस. फोर. जी. हॉटेल (S4G Hotel) , थेऊर फाटा, पुणे – सोलापूर रोड, पुणे या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. याप्रसंगी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील विजय पाटकर, जयवंत वाडकर, स्मिता गोंदकर, गायक उत्कर्ष शिंदे, देव माणूस फेम बालकलाकार मिमी खडसे असे अनेक दिग्गज कलाकार या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. (The Dark Shadow Motion Pictures)

दिग्दर्शक रामकुमार शेडगे म्हणाले की सर्व जागतिक सौंदर्यस्पर्धांचे स्वरूप केवळ शारीरिक सौंदर्य एवढ्या-पुरतेच मर्यादित न राहता सौंदर्यवतींचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, कार्यक्षमता यांच्या मूल्यमापनावर आधारित असते. भारत हा व्हेनेझुएलानंतरचा दुसरा असा देश आहे, की ज्याने जास्तीत जास्त वेळा मिस् वर्ल्ड हा किताब जिंकला आहे. अलीकडे सौंदर्यस्पर्धा ह्या फक्त स्त्रीवर्गाशी निगडित न राहता लहान मुले, पुरुष यांमध्येही होतात. स्त्री, पुरुष, लहान मुले यांचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, कार्यक्षमता आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी या समर क्वीन, किंग, प्रिन्स, प्रिन्सेस सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. (The Dark Shadow Motion Pictures)

या स्पर्धेमध्ये अभिनेत्री व मॉडेल गुर्मीत कौर मान या सौंदर्य स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार असून,
डॉ. अंजली आवटे, अभिनेता राहुल बोराडे जज्ज म्हणून काम पाहणार आहेत. त्याच बरोबर नक्षत्रचे गणेश तुम्मा,
एस. फोर. जी हॉटेलचे शिवाजी जावळे, ग्रूमिंग विनोद टेमगिरे पाहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सोनी,
हेअर मेकअप सुप्रिया देशपांडे, पूजा काठमवाड, श्रद्धा दराडे, क्लॉथ डिझाईनर सोमय्या पठाण, पोस्टर सुजय दंताळे,
आकाश जाधव हे काम पाहत आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९८९०७७५६९६ या संपर्कावर संपर्क करावा.

Web Title :- The Dark Shadow Motion Pictures | Organizing the Summer Queen, King, Prince, Princess beauty pageant; Many celebrities like Vijay Patkar, Jaywant Wadkar, Smita Gondkar, singer Utkarsh Shinde will be present

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | भाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण कारवाई करणाऱ्यांना बांबुने मारहाण; वारजेमधील घटना, दोघे जखमी

Nashik Crime News | अज्ञात महिलेने घरात घुसून आईला बेशुद्ध करून 3 महिन्यांच्या मुलीची केली हत्या, नाशिकमधील घटना

Symptoms Of Stress | तणाव घेतल्याने वाढतो ‘या’ 2 गंभीर आजारांचा धोका; जाणून घ्या