दहशतवाद्यांसोबत पकडल्या गेलेल्या काश्मीरच्या DSP च्या मुली ‘या’ देशात शिकतात, त्यांच्या खर्चाचीही होणार चौकशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधून पकडल्या गेलेल्या डीएसपी प्रकरणात सर्व एजन्सींनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, दहशतवाद्यांसह पकडलेल्या डीएसपी दविंदर सिंहच्या दोन मुली बांग्लादेशात एमबीबीएस शिकत असल्याची माहिती मिळाली आहे. अशा परिस्थितीत मुलींच्या अभ्यासाचा खर्च हवाला पैशातून होत असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. डीएसपीच्या घरावर टाकलेल्या छाप्यात सैन्याच्या 15 कोर्सेसचा संपूर्ण लोकेशन नकाशा सापडला आहे. त्यामुळे लष्कराचा नकाशा मिळाल्यानंतर लष्कराबद्दल बरीच माहिती दहशतवादी आणि पाकिस्तानपर्यंत पोहोचू शकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या तपासादरम्यान साडेसात लाख रुपयांची रोकडदेखील जप्त केली आहे. त्यामुळे हे पैसेदेखील हवालाचे असू शकतात. त्याचवेळी, हिज्बुल कमांडर नवीद बाबू यांच्यासह निलंबित डीएसपी दविंदर सिंह यांच्या पाकिस्तानी कनेक्शनच्या चौकशीत सुरक्षा संस्था व्यस्त आहेत. त्यांच्या सोबत आणि त्यांच्या नातेवाईकांची देखील चौकशी करण्यात आली आहे. डीजीपी दिलबाग सिंह असेही म्हणतात की, या प्रकरणात मोठे कनेक्शन समोर येऊ शकते. त्याच वेळी, याचे कनेक्शन कोणाशीही, कोठेही जोडल्या जाऊ शकतात. हा एक मोठा मुद्दा आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) करण्याची शिफारस करण्यात आली आहे. डीएसपीला काढून टाकण्याच्या सूचनेसह त्यांना मिळालेला राज्य पुरस्कार मागे घेण्यात आला आहे. एनआयए लवकरच या प्रकरणात एफआयआर दाखल करणार आहे.

दविंदर सिंह यांच्या नातेवाईकांच्या घरीही तपास सुरु असून त्याने शस्त्रे किंवा पैसा लपविला आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. तपासात सामील झालेल्या आयबी आणि रॉ या एजन्सी डीएसपी आणि हिज्बुल कमांडरची चौकशी करत दहशतवाद्यांशी संपर्क साधत होते. दक्षिण काश्मीरमधील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. ठिकठिकाणी छापे टाकल्यामुळे अनेक धक्कादायक तथ्य समोर आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like