‘लिची’ खाल्ल्याने १२५ बालकांचा मृत्यू ? काय आहे तथ्य, खाताना ‘अशी’ घ्यावी काळजी !

मुझफ्फरपूर (पाटणा) : वृत्तसंस्था – बिहारमध्ये ‘चमकी’ या मेंदूच्या तापाच्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या बालकांची संख्या १२५ च्या आसपास पोहोचली होती. सुरुवातीला हा ताप नेमका कशामुळे येतो आणि याचे कारण काय याबद्दल मोठे गूढ होते. यंदा जानेवारीपासून २०० च्या आसपास या तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. लिची या फळाच्या सेवनाने हा मृत्यू होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. एक संशोधन निबंध लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात हे मृत्यू लिचीच्या सेवनाने झाले असल्याचा संशय व्यक्त केला आहे. बिहारच्या आरोग्याधिकाऱ्यांनीही या संशयास दुजोरा दिला आहे.

लिची हे फळ उन्हाळ्याच्या शेवटी सर्वत्र मिळू लागते. बिहारमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. यांच्या सेवनामुळे एक्यूट कोरोनरी सिंड्रोम (AES) म्हणजेच ‘चमकी’ ताप येतो. हा आजार शरिरातील मुख्य मज्जासंस्थेला प्रभावित करतो. मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांची मज्जासंस्था कमजोर असल्याने त्यावर जास्त परिणाम होतो. सुरुवातीला ताप आल्यानंतर हालचालीवर परिणाम, बेशुद्ध होणे, शरीर दुखणे, मानसिक अस्वास्थता, आकड्या येणे, भीती इत्यादी लक्षणे दिसतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्ण कोमामध्ये देखील जाऊ शकतो. यामध्ये रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. हा आजार जून ते सप्टेंबर दरम्यान बळावतो. दरवर्षी या आजाराचे काही रुग्ण आढळून येतात. २०१४ पासून या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत.

लिची खरंच जीवघेणे ? काय आहे नेमका प्रकार
खरे तर योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे खाल्यास लिची धोकादायक नाही. मात्र लिची उपाशीपोटी खाल्ले तर मात्र धोका निर्माण होऊ शकतो. या फळामध्ये हायपोग्लायसिन ए आणि मेथिलीन सायक्लो प्रोपायली ग्लिसरीन हे घटक आढळून आले. यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण अचानक मोठ्या प्रमाणावर कमी होतं. यास वैद्यकीय भाषेत ‘हायपोग्लायसिमिया’ असे म्हणतात. यामुळे चयापचयाची क्रियाही बिघडते. त्यामुळे लिचीचे फळ खाल्ल्यानंतर रात्री किंवा पुढील २४ तास जेवण न केल्यास ‘चमकी’ आजार होतो असे समजते.

लिची खाण्याआधी काय काळजी घ्यावी
– सकाळी किंवा सायंकाळी उपाशीपोटी लिची खाऊ नये.
– न पिकलेली लिचीची फळे खाणे टाळा. कच्च्या फळात हि रसायने जास्त असून त्यामुळे उलट्या होण्याची शक्यता असते.
– लिचीमधील बियांमध्ये मेथिलीन सायक्लो प्रोपायली ग्लिसरीन अधिक प्रमाणात असल्याने बिया खाऊ नयेत.
– एकाच वेळी लिचीची अधिक फळे खाऊ नयेत.
– साली सहित फळे खाऊ नयेत. सालींमधे घटक रसायने असू शकतात.
– लिचीचे सेवन कमी करणे, सायंकाळचे जेवण न टाळणे, नेहमी ग्लुकोजची तपासणी करणे हे उपाय तज्ज्ञांनी सुचवले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’, ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’साठी देखील फायदाच

#YogaDay2019 : नियमित योगा करा…आणि स्मरणशक्ती वाढवा

“संधिवात” बरा करायचा असेल तर पाळा हे पथ्य

 

You might also like