धक्कादायक ! छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलीने गुरुवारी (दि.२५) शाळा सुटल्यानंतर चार वाजता ती मामाच्या शेतातील घरी आली आणि तिने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर स्वाराती रुग्णालायात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून टवाळखोरांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.

केज तालुक्यातील गप्पेवाडी गावातील एका १६ वर्षाची मुलगी शिक्षणासाठी मामाच्या गावी रहात होती. तिला १० वीच्या वर्गात शिक्षण घेत असताना तिला जवळच्या शिंदी गावातील शाळेत शिक्षणासाठी जावे लागत होते. त्याच वेळी गावातील टवाळखोर मुले तिला अडवून त्रास देत होती. घरातील लोकांना सांगून देखील त्या मुलांचा त्रास कमी झाला नाही. उलट त्या टवाळखोर मुलांनी मामाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने विषारी औषध पिवून आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसर, गावातील अशोक रामदास केदार (वय-१९) हा टवाळखोर तिला त्रास देत होता. हा प्रकार तिने मामाला सांगितल्यावर मामाने गावात बैठक बोलावून त्या मुलाला समजावून सांगितले. मात्र काही दिवसांनी त्याने मुलीला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. ति शाळेत जात असताना तिची छेड काढू लागला. तसेच त्याने मामाला जीवे मारुन टाकण्याची धमकी मुलीला दिली. अशोक केदार याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अशोक केदार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केले असून आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपीच्या भावासह त्याच्या आईला ताब्यात घेतले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –