रेल्वे ब्रिजच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू, कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
मांजरी बुद्रूक येथे रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी पाडलेल्या खड्ड्यात पडून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. युवकाच्या मृत्यू प्रकरणी व्हि.एस. पटेल कंपनीचे अधिकारी आणि साईट सुपरवायझर सुरज पाटील यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.१३) पहाटे मांजरी बु यथील कोलावरी डी हॉटेल समोर घडली होती.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’75a6ed3c-cf99-11e8-9774-1188a01f9823′]
सतीश ज्ञानेश्वर पिसे (वय २६, रा. मलठण फाटा, ता. शिरूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ किशोर ज्ञानेश्वर पिसे (वय-३२) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सतीश हा एका गॅस एजन्सीमध्ये कामाला होता. तो शनिवारी पहाटे मांजरी बुद्रुकवरून हडपसरच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8122d6b7-cf99-11e8-89ba-39adfc91162e’]
मांजरी बु येथे रेल्वे ब्रिजसाठी खड्डे खाणण्यात आले आहेत. या खड्यांना बॅरेगेटस् लावण्यात आले नसल्याने या ठिकाणी लहान मोठे अपघात होत असतात. सतिश पिसे याचा देखील या खड्ड्यात पडून गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. सतिश पिसे याच्या मृत्यूला संबंधीत ठेकेदार कारणीभूत असल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. संबंधीत ठेकेदाराने या ठिकाणी ब्रिजसाठी खड्डे खाणले आहेत. मात्र, रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सतिश याचा मृत्यू झाला. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी व्हि.एस. पटेल कंपनीचे अधिकारी आणि साईट सुपरवायझर सुरज पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी संबंधित ठेकेदार, कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. तसेच जोपर्यंत नागरिकांना पर्यायी रस्त्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत काम चालू करू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
[amazon_link asins=’B01M0505SJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b6a3bd1a-cf99-11e8-be54-6d75d19883b3′]
तसेच या प्रकरणी ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी आमदार शिवसेना पुणे शहरप्रमुख महादेव बाबर यांनीही हडपसर पोलीस स्टेशनला येऊन पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी गुन्हेचे पोलीस निरीक्षक हमराज कुंभार, शिवसेना विभागप्रमुख विक्रम लोणकर, संतोष होडे, राम खोमणे, अशोक भंडारी, दिलीप व्यवहारे, योगेश जैन, दादा आहिरे, विजू दरेकर, दत्ता खवळे आदी उपस्थित होते.