कोपर्डी प्रकरणातील आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची तात्काळ अमंलबजावणी व्हावी

इंदापूर : प्रतिनिधी(सुधाकर बोराटे) –  कोपर्डीच्या घटनेचा दि.१३ जुलै रोजीचा स्मृती दिन राज्यभर मराठा समाज हा काळा दिवस म्हणून पाळत आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठा समाज हा कोपर्डीच्या पिडीतेला न्याय मिळावा म्हणून शांततेच्या मार्गाने प्रयत्न करीत आहे, परंतु आजही कोपर्डीच्या ताईस न्याय मिळालेला नाही. दोषी आरोपींना न्यायालयाने दिलेली फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी शासनाकडून तात्काळ व्हावी या व इतर मागण्यांचे निवेदन सकल मराठा सेवा संघाच्या वतीने पूणे जिल्हापरिषद सदस्या अंकीता पाटील, माजी उपनगराध्यक्ष कृृष्णा ताटे यांचेसह पदाधीकार्‍यांनी इंदापूर तहसीलदार यांना निवेदन दीले आहे.

कोपर्डी पिडेतेच्या न्यायासाठी सरकार गंभीर दिसत नाही. मराठा समाज न्यायासाठी रस्त्यावर उतरला परंतू कोपर्डीच्या भगिनीला जनतेने निवडून दिलेले सरकार न्याय देत नाही यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. यावर्षी आम्ही राज्य सरकारला जागे करण्यासाठी राज्यातील मराठा समाज शांततेच्या मार्गाने निषेध करीत आहे व कोपर्डीच्या नराधमांना एक महिन्याच्या आत फाशी द्यावी,अशी आमची मागणी आहे, यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आहे.

यासह मराठा आरक्षण कायम राहावे यासाठी सरकारने आपली बाजू न्यायालयामध्ये ताकदीने मांडली पाहिजे.त्यासाठी अभ्यासु कायदेतज्ज्ञ नेमावेत.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील गरीब आणि होतकरू युवकांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत यासाठी कायदा करावा व कर्ज मीळावे.राज्यातील प्रत्येक जिल्यात मराठा समाजातील युवकांसाठी वसतीगृृृृह निर्माण करावे अशा इतरही आनेक मागण्या असुन या मागण्याबाबतचे निवेदन इंदापूर तहसिलदार यांना सकल मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात आले.सदरचे निवेदन पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील,माजी उपनगराध्यक्ष कृृष्णाजी ताटे, ऋतुजा नायकुडे, निकिता पवळ, प्रतिभा करपे तसेच जयंत नायकुडे, पवन घोगरे, प्रवीण पवार, राम आसबे, सचिन सावंत, प्रेमकुमार जगताप,भारत जामदार आदीं उपस्थीत होते.