मराठा आंदोलनामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द : पुणे विभागाचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यामध्ये ठिकठिकाणी मराठा मोर्चाकडून आंदोलने करण्यात येत आहेत. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले असून आंदोलन कर्त्यांनी एसटीला लक्ष केले आहे. आंदोलनाच्या कालावधीत प्रत्येक ठिकाणी एसटी बस पेटवण्यात आली तसेच तिची तोडफोड करण्यात आल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला प्रचंड मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
[amazon_link asins=’B01JA596UU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8dd4db1c-9403-11e8-b4a2-d34d54784769′]
होणारे नुकसान व प्रवाशांची सुरक्षितता या दोन्ही कारणांमुळे पुण्याहून सोलापूर, नाशिक आदी ठिकाणी सुटणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत, अशी माहिती पुणे वि़भाग नियंत्रण कक्षाच्या यामिनी जोशी यांनी दिली आहे. विविध भागात निर्माण झालेली तणाव सदृश परिस्थिती नियंत्रणात आल्यावर या गाडया पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.