नीरेत Lockdown काळात सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान आस्थापना चालू ठेवण्याचा निर्णय – राजेश काकडे

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) –   पुरंदर तालुक्यातील नीरा येथे लॉकडाऊन काळात सकाळी दहा वाजलेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत शासनाच्या निर्देशानुसार ज्या अस्थापनांना परवानगी आहे त्या अस्थापना चालू ठेेेेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे  नीरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश काकडे यांनी सांगितले.

नीरा ( ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदार व गटविकास अधिका-यांच्या सुचनेनुसार व्यापा-यांची बैठक ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केली होती. त्यावेळी राजेश काकडे बोलत होते. यावेळी सरपंच तेजश्री काकडे, नीरा पोलिस दुरक्षेञाचे फौजदार कैलास गोतपागर, माजी जि.प.सदस्य विराज काकडे,  ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, संदीप धायगुडे, अनंता शिंदे, वैशाली काळे, सारिका काकडे, ग्रामसेवक मनोज डेरे, मंडलाधिकारी संदीप चव्हाण, सहा. फौजदार सुदर्शन होळकर, पोलिस पाटील राजेंद्र भास्कर, विजय शिंंदे, व्यापारी राजकुमार शहा, अरविंद शहा, प्रकाश कदम, बाबा बागवान, मनोज रावळ यांच्यासह इतर व्यावसायिक उपस्थित होते.

यावेळी बैठकीत  सासवड व नीरा येथील कोरोना रूग्णांची परिस्थिती वेगळी असल्याने शासनाच्या निकषानुसार ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या काळात  किराणा, फळे, भाजीपाला, मटण, चिकन, मच्छी, पार्सल सेवेतील वडापाव सेंटर्स,  हॉटेल ही अस्थापने सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत अस्थापना सुरू ठेवण्याचा व्यापारी व ग्रामपंचायत प्रशासनाने  एकमुखी निर्णय घेतला आहे.  तर वर्तमानपञे व दुध अस्थापना सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान,शासनाच्या आदेशानुसार ३० एप्रिल पर्यंत दर शनिवारी व रविवारी विकेंड लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे.माञ या दरम्यान  अत्यावश्यक सेवेतील मेडिकल स्टोअर्स व दवाखाने सुरू राहणार आहेत.

दुकानदारांच्या मालकांचे व कामगारांचे  कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय….

नीरा गावातील ज्या व्यापा-यांची दुकाने सुरू आहेत. त्या दुकानदारांच्या मालकांचे व कामगारांचे कोरोना अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपसरपंच राजेश काकडे यांनी सांगितले. या टेस्टसाठी कोणत्याही व्यापा-यांनी विरोध करावयाचा नाही असेही या बैठकीत ठरविण्यात आले आहे. तसेच जे व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह येतील त्यांनी तातडीने आपली दुकाने बंद ठेवावीत असे राजेश काकडे यांनी सांगितले.