केंद्र सरकारची ‘ती’ मागणी व्हॉट्सअॅपने फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध असलेल्या व्हॉटस्अॅपने केंद्र सरकाने केलेली मागण फेटाळून केंद्राला झटका दिला आहे. केंद्र सरकारने व्हॉटस्अॅप प्रशासनाला मुळ संदेशापर्यंत पोहचण्यासाठीची प्रणाली विकसीत करण्यास सांगितले होते. चुकीच्या संदेशामुळे देशभरात हैदोस घातला जात आहे. अशाच अफवेच्या संदेशामुळे जमावाकडून अनेकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे फेक न्युजला कारणीभूत असलेल्या व्हॉटस्अॅपला केंद्राकडून धारेवर धरण्यात येत आहे.
[amazon_link asins=’B01LQQHI8I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’663e5c50-a6e3-11e8-b171-69a6bd32c8df’]

मुळ संदेशापर्यंत पोचण्याची प्रणाली विकसित केली तर ‘एंड टू एंड इनस्क्रीप्शन’ व युझरांच्या ‘प्रायव्हसी’वर अतिक्रमण होऊ शकेल असे व्हॉट्सअॅपकडून स्पष्ट करण्यात आले. लोकांना चुकीच्या माहितीपासून परावृत्त करण्यासाठी प्रशासनाकडून लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. व्हॉट्सअॅप प्रवक्त्याने यासंदर्भात माहिती दिली. आम्ही युझरांना दिलेल्या प्रायव्हसीला धक्का लावून कमकुवत करणार नाही असे प्रवक्त्याने स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांमध्ये व्हॉट्सअॅपवरून व्हायरल होत असलेल्या फेक न्यूज मुळे देशभरात अनेक हत्या झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस डॅनियल यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेनंतर रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअपला स्थानिक व्यावसायिक कंपनी स्थापन करण्यासह तक्रार अधिकारी नेमण्यास सांगितले होते. जर व्हॉट्सअॅपकडून उपाययोजनांवर प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास गुन्ह्याला प्रोत्साहान दिल्याचा ठपका बसू शकतो असा इशारा सुद्धा त्यांनी दिला होता.
[amazon_link asins=’B00GASLORE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6d3050f7-a6e3-11e8-826c-b74b7dac0955′]

व्हॉट्सअॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेक न्यूज सोशल मीडियातून व्हायरल होऊ नयेत यासाठी केंद्र सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतामध्ये व्हॉट्सअॅपचे २० कोटी युझर्स असून जगभरात १५० कोटी युझर्स आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने दोन वेळा व्हॉट्सअॅपला नोटीस धाडली होती. व्हॉट्सअॅपने नव्या अपडेटमध्ये संदेश फॉरवर्ड करण्यावर मर्यादा आणल्या आहेत. आता केवळ पाच जणांनाच संदेश फॉरवर्ड करता येतो.