रिक्षा चालकाच्या मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची केलेली घोषणेची शासनाने लवकरात लवकर अमलबजावणी करावी, राज्यातील बेकायदेशीर वाहतूक बंद करण्यात यावी, वाढलेले इन्शुरन्स चे दर कमी करण्यात यावे, ओला व उबेर या भांडवलदार कंपनी वर कारवाई करावी यासह १६ ठरावावर रिक्षा चालक, मालकांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. हे सर्व प्रश्न शासनाने लवकर सोडवण्याची मागणी करण्यात आली.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d2e99a6b-8133-11e8-acf7-b329d5b7b163′]

महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती ची राज्यस्तरीय बैठक पिंपरी चिंचवड येथील हॉटेल अल्पईन येथे आयोजित करण्यात आली होती.

राज्यकृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव (मुंबई), कार्याध्याक्ष विलास भालेकर (नागपूर), संपर्कप्रमुख नरेंद्र गायकवाड (नांदेड), गफ्फार नदाफ (कराड), प्रोमोद घोने (मुंबई), प्रल्हाद सोनावणे (जळगांव), महेश चौघुले (सांगली) मारुती कोंडे, ज्ञानेश्वर बोर्डे , (नवी मुंबई) शिवाजी गोरे, राहुल कांबळे , गणेश जाधव (कल्याण डोंबिवली) तानाजी मसलकर बाळू फाळके , शिवाजी राजगुरू, राजू शिदगणे (सोलापूर), मच्छिंद्र कांबळे, संतोष शिंदे (लातूर), वैजनाथ देशमुख बालाजी कोकरे (नांदेड), मोक्षवीर लोहकरे (चंद्रपूर), आनंद तांबे श्रीकांत आचार्य, अशोक साळेकर, दत्ता पाटील, अबा बाबर, आनंद अंकुश नितीन शिंदे (पुणे), विनोद वरखडे, बाळासाहेब डुंबरे, सुदाम बनसोडे, दत्ता कांबळे (पिंपरी चिंचवड) यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्यातील रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
[amazon_link asins=’B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’da89cfa8-8133-11e8-a09d-dd53c159a08a’]

या वेळी शशांक राव म्हणाले की राज्य सरकारने सर्व रिक्षा चे परवाने खुले केले असुन मुंबई मध्ये रिक्षा परवाना खुला केल्यामुळे ओला व उबेर या भडवलंदार कंपनीच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे , असे मनोगत व्यक्त केले.

या वेळी कृती समितीचे राज्य सरचिटणीस कामगार नेते बाबा कांबळे म्हणाले सर्व संघटना एकत्र करून कृती समितीचे गठन करण्यात आले आहे. कृती समितीचे काम वाढत असून या मुळे रिक्षा चालकांचे प्रश्न सुटत आहेत कृती समिती मध्ये सामील संघटनाने नागपूर मध्ये एकजूटिने मोर्चा काढून ताकद दाखवल्यामुळे राज्य सरकारने कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली असे बाबा कांबळे म्हणाले.