झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – गाढ झोपेत असताना कुणीतरी छातीवर बसून दाबून धरले आहे. गळा दाबत आहे, प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत जोरजोरात ओरडण्याचा प्रयत्न करताय, पण तोंडातून आवाज फुटत नाही, उठण्याचा प्रयत्न करूनही उठता येत नाही, अशातच जाग येते, घाबरल्याने अंगाला दरदरून घाम आलेला असतो, असा अनुभव कधी तरी प्रत्येकाला येतो. परंतु, असे वारंवार होत असल्यास हा स्लीप पॅरालिसिस असू शकतो. हा आजार काही जीवघेणा नाही.

झोपेत मेंदू जागृतावस्थेत राहणे ही स्लीप पॅरालिसिसची अवस्था आहे. परंतु शरीर निद्रेत असते. अशा वेळी तुम्ही हलण्याचा वा उठण्याचा प्रयत्न केल्यास एखादी गोष्ट तसे करू देत नाही. वाटते की, छातीवर भूत बसले आहे. याबाबत तज्ज्ञ सांगतात की, स्लीप पॅरालिसिसमध्ये जेव्हा व्यक्ती जागृतावस्थेत येतो तेव्हा त्यास आपल्या शरीरावर नियंत्रण मिळवता येत नाही. यामुळे त्याला शरीराचा कोणताही अवयव हलवता येत नाही. निद्रानाशग्रस्त व्यक्तीस असा अनुभव जास्त येतो.

रात्री जागे राहण्याच्या आणि झोपण्याच्या अवस्थेदरम्यान होणाऱ्या क्रमाला स्लीप पॅरालिसिस म्हणतात. तेव्हा शरीर मेंदूच्या आज्ञा स्वीकारत नाही आणि जड होऊन जाते. जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तेव्हा त्याचा मेंदू त्याच्या शरीराला आणि मनाला शक्तिहीन करतो. परंतु कधी-कधी मेंदू जागृत होतो, परंतु शरीर झोपलेले राहते. जेव्हा मेंदू शरीराआधी उठतो तेव्हा स्लीप पॅरालिसिसची स्थिती निर्माण होते. पण बहुतांश जणांमध्ये ही स्थिती काही वेळात आपोआप ठीक होते.

स्लीप पॅरालिसिसग्रस्त बहुतांश जणांचा दावा असतो की, जाग येताच त्यांना असे वाटले की, त्यांच्या छातीवर एखादे भूत बसलेले आहे, ज्याचा चेहरा खूप भीतिदायक आहे. तो त्यांना जागेवरून उठू देत नाही. त्याने जखडून ठेवलेले आहे. परंतु वास्तवात असे मेंदू सुन्न झाल्याने होते. कारण भीतिदायक स्वप्नांची निर्मितीही याच काळात होत असते. शास्त्रज्ञ म्हणतात की, छातीवर हात ठेवून झोपणाऱ्या लोकांमध्ये अशी स्थिती नेहमीच तयार होते. झोपेत छातीवर दबाव पडल्याने निद्रा कायम राहते, परंतु मेंदू अवचेतनेत राहतो.

अशा वेळी हातांचा छातीवर दबाव भीतिदायक अनुभव करून देतो. व्यक्तीला वाटते की, त्यांच्या छातीवर एखाद्या भुताचा दबाव आहे, प्रत्यक्षात तो स्वत:चेच हात छातीवर ठेवून आवळत असतो. जर नेहमीच असे होत असेल तर एका कुशीवर अथवा हात सरळ ठेवून पाठीवर झोपावे. वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे तसेच पूर्ण झोप घेतल्यास असा त्रास होणार नाही.

आरोग्य विषयक वृत्त –

गॅस्ट्रोबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, १२० रुग्ण बाधित

पुण्यातील नामांकित रुग्णालयातील ट्रेनी डॉक्टरला फेसबुक मैत्री पडली महागात

दिवसभरात ३ कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नका, ‘हे’ होतील दुष्परिणाम

महिन्यात पुन्हा एकदा मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय