नोटबंदी क्षणात होते राममंदिर का नाही : उद्धव ठाकरे

पुणे: पोलिसनामा ऑनलाईन

 

आज अमित शहा यांनी २०१९  च्या लोकसभा निवडणुका सुरु होण्यापूर्वी  राम मंदिराचे बांधकाम सुरु होणार असे विधान केले होते. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले “नोटबंदी कशी  एका क्षणात लागू केली तसेच राममंदिर एका क्षणात का होऊ शकत नाही, राममंदिर, समान नागरी कायदा, 370 कलम रद्द करणे या सगळ्या गोष्टी यापूर्वीच  व्हायला हव्या होत्या. त्या गोष्टी आतापर्यंत का नाही झाल्या ? “असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
[amazon_link asins=’B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’569c815a-8754-11e8-a42b-6bb872b03e3d’]

नाणार प्रकल्पाला शिवसेनेकडून  कडाडून विरोध आहे असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना  स्पष्ट केले. तसेच भगवद्‌गीता मला चाळायाची आहे ती नक्की संस्कृत आहे की गुजराती भाषेत आहे? असे सांगत  उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला  लावला. आज पुणे येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, की गेले काही वर्ष पुण्याकडे दुर्लक्ष झाले हाेते. परंतु अाता मी पुण्याकडे अधिक लक्ष देणार असून मला पुण्यात वारंवार यायला अावडेल. मुंबईतील खड्ड्यांविषयी त्यांना विचारले असता पावसाळ्यात खड्ड्यांची जबाबदारी सगळ्यांची असल्याचे ते म्हणाले. तसेच मुंबई विद्यापीठातील गाेंधळ टाळण्यासाठी गीता वाटपाचा कार्यक्रम भाजपाने सुरु केला असल्याची टीकाही त्यांनी केली. पुण्यात शिवसेनेला मरगळ अाली नसून शिवसेनेत काेणीही लेचेपेचे नसल्याचेही त्यांनी अावर्जून सांगितले.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d69631cd-8754-11e8-ba10-7f641e69c3df’]