‘हे’ जगातील सर्वात भयंकर पुस्तक, केवळ एक रात्रीत लिहून काढलं सैतानानं

पोलीसनामा ऑनलाईन – ख्रिस्ती धर्माचा आधारशीला आणि ख्रिश्चनांचा पवित्र धर्मग्रंथ मानल्या जाणाऱ्या बायबलविषयी आपणा सर्वांना माहिती असेलच, परंतु जगात असे एक पुस्तक आहे ज्याला ‘डेविल्स बायबल’ म्हणजेच ‘सैतानाचे बायबल’ म्हणून ओळखले जाते. हे जगातील सर्वात रहस्यमयी सैतानाचे पुस्तक मानले जाते, कारण त्याच्या पहिल्या पानावरच एका सैतानाचे चित्र तयार केले गेले आहे. याशिवाय पुस्तकाच्या इतर पानांवर फक्त भुतांचीच चित्रे तयार काढली गेली आहेत.

तसेच, हे रहस्यमय सैतानी पुस्तक ‘कोडेक्स गिगास’ म्हणून देखील ओळखले जाते. हे पुस्तक जगातील सर्वात धोकादायक पुस्तक देखील मानले जाते, कारण हे पुस्तक कोणी लिहिले आहे आणि का लिहिले आहे हे आजपर्यंत माहित झालेले नाही. सध्या ते स्वीडनच्या ग्रंथालयात ठेवले आहे. हे पुस्तक मानवांच्या मनातही उत्सुकता निर्माण करते, कारण हे कागदाच्या पानांवर नव्हे तर चामड्याच्या बनलेल्या पानांवर लिहिले गेले आहे. 160 पानांचे हे पुस्तक खूप वजनदार आहे. त्याचे वजन सुमारे 85 किलो असल्याचे सांगितले जाते. याला उचलण्यासाठी कमीतकमी दोन लोकांची गरज लागते.

या पुस्तांबाबत असेही म्हंटले जाते की, हे पुस्तक फक्त एका रात्रीत लिहिले गेले होते. यामागील कथा प्रचलित आहे की, 13 व्या शतकात एका भिक्षूने त्याच्या मठवासी प्रतिज्ञांना मोडले, त्यानंतर त्याला भिंतीत जिवंत गाडण्याची शिक्षा सुनावण्यात आली. ही कठोर शिक्षा टाळण्यासाठी त्याने एका रात्रीत असे पुस्तक लिहिण्याचे वचन दिले जे सर्व मानवी ज्ञानासह मठला कायमचे गौरवांकित करेल. त्याला हे करण्याची परवानगी होती, परंतु म्हणतात की, मध्यरात्री जेव्हा त्याला समजले की, आपण संपूर्ण पुस्तक एकट्याने लिहू शकत नाही, तेव्हा त्याने एक विशेष प्रार्थना केली आणि सैतानाला बोलावले. आपल्या आत्म्याच्या बदल्यात पुस्तक पूर्ण करण्यासाठी त्याने सैतानाला मदत मागितली. सैतान यावर सहमत झाला आणि त्याने रात्री संपूर्ण पुस्तक लिहिले.