देशातील हुकूमशाही सात-आठ महिन्यांत संपणार- राज ठाकरे

चिपळून : वृत्तसंस्था

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे कोकण दाैऱ्यावर असून, एक माणूस खोटे बोलून संपूर्ण देशाला फसवतो आहे. देशातील हुकूमशाही सात- आठ महिन्यांत संपणार असे म्हणत त्यांनी मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. विशेष म्हणजे आजच मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. चिपळून येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गुडीपाडवा मेळाव्यापासून राज यांनी मोदी सरकारच्या विरोधात आघाडीच उघडली आहे. आज (शनिवारी) चिपळून येथे बोलताना मोदी बद्दल विचारणा केली असता त्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख हुकूमशहा असा केला. तसेच देशातील हुकूमशाही येत्या सात-आठ महिन्यांत संपेल, असा दावा देखील राज ठाकरे यांनी केला.

केंद्रातील मोदी सरकार आज (शनिवारी ) चार वर्षाचा कालावधी पूर्ण करत आहे. साफ नीयत-सही विकास हा नवा नारा मोदी सरकारने या निमित्ताने दिला आहे. तर, दुसरीकडे विरोधक हा दिवस ‘विश्वासघात दिन’ म्हणून पाळणार आहेत.