लग्नातील जेवण पडले महागात ,शंभर जणांना विषबाधा

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन
सध्या सर्वत्र लग्नसराईचे दिवस आहेत. या सिजनला काही गणगोत लागू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतलेली असते. तरी सुधदा एखाडा प्रसंग असा घडला सांगली येथे. एका लग्न समारंभात जेवणामुळे १०० जणांना विषबाधा झाल्याचे वृत्त आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात घडली.

तासगाव येथील मंगल कार्यालयात दोन दिवसांपूर्वी आरवडे आणि येळावी कुटुंबीयांचा लग्नसोहळा पार पडला. त्या दरम्यान ही घटना घडली. या लग्नाचे जेवण केल्यानंतर काहींना उलटी आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे काही लोकांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . तर काहींना प्राथमिक आरोग्य केंद्र आरवडे येथे दाखल करण्यात आले. या प्रकरणातील रुग्नांची संख्या खूप जास्त होती त्यामुळे वैद्यकीय अधिकारी कमी पडू लागल्याने मांजर्डे, डोर्ली आणि गौरगाव येथून वैद्यकीय मदत मागवण्यात आली. सध्या या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

लग्नात जेवणाबरोबरच मठ्ठा देण्यात आला होता. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने लोकांनी मठ्ठा जास्त प्रमाणात प्यायला. पण मठ्ठा बनवल्यानंतर तो बनवण्यासाठी वापरलेले पाणी आणि त्यात टाकलेला बर्फ हा दूषित असल्यामुळेच हा प्रकार झाला असवा, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.