संचालकाच्या पत्नीने प्राध्यापकाकडून पेपर सोडवून घेतले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

संचालकाच्या पत्नीने आपला एमईचा पेपर एका प्राध्यापकाकडून सोडवून घेतल्याचा धक्कादाक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील नऱ्हे भागात असलेल्या झील एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात हा प्रकार घडला. या प्राध्यापकाने विद्यापीठाासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकामुळे हा प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B079Y5RW5S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’04af28b6-8517-11e8-b93b-19a2767c8261′]

झील एज्युकेशन सोसायटीचे संचालक जयेश काटकर यांच्या पत्नी स्नेहल जगताप एमईचे शिक्षण घेत आहेत. पहिल्या वर्षाचा पेपर दबाव टाकून सोडवून घेतल्याचे संबंधित प्राध्यापकाने तक्रारीत म्हटले आहे. आपण पेपर सोडवताना परीक्षार्थी जगताप प्राचार्य़ांच्या केबिनमध्ये बसून राहत असल्याचेही प्राध्यापकाने सांगितले.

झालेल्या या गैरप्रकारात आपल्याला माफीचा साक्षीदार करण्याची मागणी देखील प्राध्यापकाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे केली आहे. या प्रकरणात संपूर्ण सहकार्य़ करण्याची तयारीही प्रध्यापकांनी दाखवली आहे. तक्ररादार प्राध्यापक रसायनशास्त्र विभागात प्रथम वर्षाला सहायक प्राध्यापक म्हणून कार्य़रत आहेत.
[amazon_link asins=’B06Y5LRXM9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0b7885af-8517-11e8-b0d1-274625549590′]

विद्यापीठाने या गोष्टीची दखल घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष समितीही नेमण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.१३) या समितीकडून संस्थाचालक आणि तक्रारदाराला चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान , जयेश काटकर यांनी म्हटले आहे की , हे सर्व आरोप खोटे असून आम्ही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत . आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध झाल्यांनतर मानहानीचा दावा टाकणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान शिक्षण क्षेत्राचे माहेर घर असलेल्या पुण्यात मात्र या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्र चांगलीच खळबळ उडाली आहे.