चर्चा योग्य दिशेने सुरु, योग्य निर्णय होईल, उद्धव ठाकरेंकडून तिढा सुटत असल्याचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाशिवआघाडीची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक होती. बैठकीत उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा झाली. बैठकीत सत्तास्थापनेची तासभर खलबतं सुरु होती. बैठकीनंतर बाहेर पडल्यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले की सत्तास्थापनेची चर्चा योग्य दिशेने सुरु आहे.

बैठकीतून बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, चर्चा पुढे सरकत आहे. घाई करण्याची गरज नाही, योग्य वेळी योग्य निर्णय होईल आणि चर्चा योग्य दिशेने सुरु आहे.

या बैठकीतून उद्धव ठाकरे बाहेर आले असले तरी विनायक राऊत हे अजूनही चर्चा करत आहे. या चर्चेत काँग्रेसचे नेते देखील अजूनही उपस्थित आहेत. परंतू उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार सत्तास्थापनेची चर्चा योग्य दिशेने सुरु आहे.

राज्यपालांनी काल राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर पुढे काय होणार अशी चर्चा रंगली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. ही राष्ट्रपती राजवट लवकरच संपणार की ताणली जाणार असा आता प्रश्नच उपस्थित झाला आहे. परंतू सत्तास्थापनेवर बोलताना, उद्धव ठाकरेच्या मते सर्व काही चांगलं सुरु आहे. चर्चा योग्य दिशेने सुरु झाली आहे. या संकेतानंतर आता महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस एकत्र येऊ शकतात असे दिसते आहे. विचारप्रणाली सत्तास्थापनेत आड येणार नाही असे महाशिवआघाडीकडून संकेत मिळताना दिसत आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like