जेजुरी मुख्य मंदिरावर सोन्याचा कळस 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

यळकोट यळकोट जय मल्हार….महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीला ‘सोन्याची जेजुरी’ म्हटले जाते. आता जेजुरी आता खऱ्या अर्थाने सोन्याची होणार आहे. कारण, जेजुरीच्या खंडेरायाच्या मुख्य मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे. यासाठी जवळपास दीड किलो शुद्ध सोन्याचा वापर करण्यात येणार आहे. सध्या खंडेरायाच्या मंदिराला सोन्याचा कळस बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या शुभ कार्याची सुरुवात देवस्थानच्या वतीने धार्मिक विधी करुन करण्यात आली. यासाठी खंडोबा देवस्थानच्या ताब्यात असलेल्या सोन्याचे विविध अलंकार आणि वस्तूंचा वापर करण्यात येणार आहे. यातून मुख्य मंदिरावरील कळस हा सोन्याचा तयार करण्यात येणार आहे.

या धार्मीक कार्यासाठी जवळपास, दीड किलो शुद्ध सोन्याचा वापर करण्यात येणार आहे. तसेच, या कामासाठी राजस्थानवरुन कुशल कारागीर बोलवण्यात आले आहेत. आठवडाभर कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली हे काम चालणार आहे. पुरातन काळापासून खंडेरायाची जेजुरी सोन्याची नगरी असे म्हटले जाते. तेच सार्थ करण्यासाठी मुख्य मंदिराच्या कळसापासून शुभारंभ करण्यात येत आहे. राज्याभरातील तसेच देशातील भक्तांनी खंडोबाला अर्पण केलेल्या विविध सोन्याच्या अलंकारातून शुद्ध सोनं तयार करून हे काम करण्यात येत आहे. पुढील आठवड्यात होणारी सोमवती यात्रा आणि त्यानंतर नवरात्र व दसरा उत्सव असल्याने त्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f5158135-c3ee-11e8-aa46-b9ae1d8a4002′]
जेजुरीचा इतिहास…

जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याजवळच्या जेजुरी सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले.

निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिक रित्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.

जाहिरात