औरंगाबादमध्ये शिक्षणसंस्थाचालकाचा गळा चिरून खून

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद शहरातील हडको परिसरात इंग्रजी शाळा चालविणाऱ्या संस्थाचालकाचा दोरीने गळा आवळून आणि धारदार शस्त्राने गळा चिरुन निघृण खून केल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली आहे. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास हिमायत बागेत उघडकीस आली. हा खून आर्थिक व्यवहारातून झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वास चंद्रशेखर सुरडकर (वय-३३ रा. श्रीकृष्णनगर, हडको) असे खून झालेल्या शिक्षणसंस्था चालकाचे नाव आहे. सुरडकर यांची हडकोतील सलीमअली सरोवर परिसरात सनराईज इंग्लीश मेडीयमची शाळा आहे. शनिवारी रात्री घरी असताना त्यांना कोणाचातरी फोन आला. त्यामुळे तातडीने घराबाहेर पडले. मात्र, रात्री ते घरी परतलेच नाहीत. नातेवाईकांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

आज सकाळी साडेआठच्या सुमारास हिमायतबाग परिसरात गस्तीवरील चौकीदाराला बांबूबेट मधील बारव शेजारी एक अनोळखी व्यक्तीचा गळा चिरुन खून करण्यात आल्याचे दिसले. चौकीदाराने या घटनेची माहिती बेगमपुरा पोलीसांना दिली. पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त एच.एस. भापकर, पोलीस निरीक्षक राजश्री आडे, पोलीस उप निरीक्षक सरवर शेख, विजय जाधव आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. श्वान पथक आणि ठस्से तज्ज्ञ, फॉरेन्सिक सायन्स विभागाच्या तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करून महत्वाचे पुरावे गोळा केले.

मृतदेहाशेजारील फोनवरून कॉल लिस्टमधील एका व्यक्तीला फोन लावला तेव्हा तो फोन मृताचा भाऊ विनोद सुरडकर यांना लागला. विनोद यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. मृतदेह पाहून विनोद यांनी मृत हा त्यांचा भाऊ विश्वास असल्याचे पोलिसांना सांगितले. पैशाच्या वादातून राजू दीक्षित यांनी हा खून केला असावा, असा संशय विनोदने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. विश्वास आणि राजू यांच्यात अनेक वर्षापासून पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद सुरू आहे. यातूनच हा खून झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी राजू दीक्षित याचा शोध सुरू केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like