कुटुंब नियोजन करताना ताणतणावाला सामोरं जाताय ? वेळीच घ्या ‘ही’ काळजी !

जेव्हा तुम्ही कुटुंब नियोजनाचा विचार करता तेव्हा ताणतणावाला दूर ठेवणं गरजेचं असतं. परंतु अनेकदा असंही होतं की, कुटुंब आणि जबाबदारी यातून बाहेर पडायला मार्ग मिळत नाही. याचा परिणाम असा होतो की, शीरीरिक आणि मानसिक ताण येतो. अशा वेळी तणावग्रस्त न होता, या समस्येवर कसा मार्ग शोधता येईल याचा विचार करावा. यासाठी काय करता येईल हे आपण जाणून घेणार आहोत.

1) नैराश्य दूर ठेवा – एकदा जर नैराश्य आलं तर मनावरील ताण वाढतो. त्यामुळं निराश व्हायचं नाही. नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देणं टाळून तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींची यादी तयार करा. स्वत:साठी वेळ द्या. दिवसभराचं नियोजन आखा आणि त्यानुसार काम करा. कामाचं योग्य नियोजन असेल तर ऐनवेळी धांदल आणि गोंधळ होणार नाही. प्रत्येक काम हे वेळापत्रकानुसार पार पडेल. यामुळं ताण किंवा नैराश्य येणार नाही.

2) नोंदवही तयार करा – आपल्या रोजच्या कामाची एक नोंदवही तयार करा. त्यात तुमच्या दिनक्रमाविषयी आवडीनिवडींविषयी, विचार मांडा. तसंच शक्य असेल तर रोज रोजनिशी लिहा.

3) योग-ध्यानधारणा – योगा, चिंतन, मनन हे मनशांती मिळवण्याचे उत्तम मार्ग आहेत. त्यामुळं नैराश्यावरही मात करता येते.

4) आनंदी रहा – लहान लहान गोष्टींमधून आनंद मिळवायला शिका. संगीत ऐका, स्वयंपाक करा, वाचन, लिखाण, बागकाम, विणकाम अशा आवडीच्या कामांमध्ये मन रमवा.

5) व्यायाम करा – व्यायाम केल्यानं शारीरिक मरगळ दूर होते. त्यामुळं व्यायाम करा. एरोबिक्स, स्ट्रेचिंग, चालणं असे व्यायाम करा.

6) सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. कारण तणाव हे वंध्यत्वाचं कारण आहे.

7) आवश्यकतेनुसार समुपदेशनाची निवड करा. हे आपल्या सर्व शंका दूर करण्यात मदत करू शकतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.