इंजिन दिशाहीन ! मुंबईमधून मनसेचे ‘हे’ दोन प्रमुख उमेदवार पराभूत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेला यावेळी मुंबईच्या मतदारसंघातून मोठी अपेक्षा होती मात्र मुंबईमध्ये मनसेला आपल्या शिलेदारांकडून निराशाच पदरी पडली आहे. माहीम मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढाई होती. या लढाई मध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी मनसेचे संदीप देशपांडे यांचा 19 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला आहे.

माहिममधून मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी सुद्धा प्रचारात पूर्ण जोर लावला. पण अखेर शिवसेनेने इथे बाजी मारली आहे. इथे जय-पराजय हा शिवसेना आणि मनसे दोघांसाठी प्रतिष्ठेचा विषय असतो. कारण माहिम विधानसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान आहे तर शिवसेनेचे पक्ष मुख्यालय शिवसेना भवन याच मतदारसंघात आहे.

तर ठाणे शहरातून देखील मनसेला चांगलीच अपेक्षा होती कारण ठाणे शहरातून मनसेचे ठाणे पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे विधानसभेच्या रिंगणात होते. मात्र भाजपच्या संजय केळकर यांनी जाधव यांचा तब्बल 20 हजार मताधिक्याने पराभव केला आहे.

संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव हे मनसेचे मुख्य शिलेदार होते मात्र मतदार राजाने त्यांना नाकारल्याने मनसेच्या इंजिनाला मोठा झटका बसला आहे. तर कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील विजयी झाल्याने मनसेने गेल्या विधासभेतील आकडा कायम राखला आहे.

Visit : Policenama.com