मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दुरुस्तीचे काम पाहताना इंजिनिअरला रोलरने चिरडले

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – रस्ता दुरुस्तीचे काम पाहण्यासाठी आलेल्या एका इंजिनिअरचा रोलरखाली चिरडून मृत्यू झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर रोलर चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे.

मनोज जगदाळे (वय 24 ) असे मृत इंजिनिअरचे नाव आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दोन्ही बाजूच्या चौथ्या लेनवर भेगा पडल्या आहेत. या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा ताण मोठा आहे. अपघात टाळता यावेत म्हणून दोन्ही बाजूंकडील दुरुस्तीचे काम सुरु आहे. दुरुस्तीच्या कामाची पाहणी करण्यासाठी जगदाळे आले होते. मात्र, रस्त्याची दुरुस्ती करणाऱ्या रोलरखाली येऊन जगदाळे यांचा मृत्यू झाला. फरार झालेल्या रोलर चालकाचा रसायनी पोलिस शोध घेत आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास आता सुपरफास्ट

दरम्यान मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. खोपोली के पुसगाव येथील नवीन मार्गिकेचे कामही जोरात सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच या कामाची पाहणी देखील केलेली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली ते खंडाळादरम्यान केबल स्टड पूलही उभारण्यात येत आहे. हा पूल पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. या पूलामुळे प्रवासाला लागणारा वेळही कमी होणार आहे.