थंडीचा कडाका सुरुच ; संपूर्ण महाराष्ट्र थंडीने गारठला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – यंदा थंडीने कहर केला असून संपूर्ण राज्य थंडीने गारठले असून नागपूर येथे रविवारी सकाळी ४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वच ठिकाणचा पारा घटला असून गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट राज्यातील अनेक ठिकाणी आली आहे.

उत्तर भारतातील अनेक राज्यात थंडीची लाट आली असून त्यात अनेक शहरे धुक्क्यात गुरफटून गेली आहे. त्याचा परिणाम विमान व रेल्वे सेवेवर झाला आहे. अनेक विमाने उशिरा सुटत आहेत. धुक्यांमुळे रेल्वेचा वेग कमी झाल्याने अनेक रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत.
राज्यात जवळपास सर्व ठिकाणी थंडी वाढली असून ती आणखी दोन दिवस अशीच टिकून राहण्याची शक्यता आहे. महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसरात पाण्यावर हिमकण जमा झालेले दिसून येत आहेत. त्याचवेळी अनेक ठिकाणी शेतातील पिकांवर  हिमकण दिसतात.

पुण्यात शनिवारी ५.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. आज रविवारी पुण्यात ६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
अहमदनगर ४.५, अकोला ५.९, अलिबाग १५़५, अमरावती ८.४, औरंगाबाद ६.८, बुलढाणा ७.५, चंद्रपूर ८.२, डहाणु १३.९, गोंदिया ५.२, जळगाव ६.६, कोल्हापूर १३.६, महाबळेश्वर १०.२, मालेगाव ७, नाशिक ७, नागपूर ४, नांदेड ७, उस्मानाबाद ८.९, परभणी ६.६, पुणे ६, सांगली १०.४, सातारा ९.४, सोलापूर १०.४, वर्धा ७.५, यवतमाळ ९.४.

सासऱ्याचं व सुनेचं होतं ‘झेंगाट’ ; अडथळा ठरणाऱ्या पतीचा लावला ‘निकाल’