PPF पेक्षाही उत्तम आहे EPF चा परतावा, अशी करा गुंतवणूक   

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) हा गुंतवणूकीचे आणि कर बचतीचे महत्वाचे माध्यम मानले जाते. प्रत्येक तिमाहीला सरकार त्याचे व्याज दर ठरवत असते. मोठ्या अवधीमध्ये मोठा लाभ म्हणून PPF एक उत्तम पर्याय मानला जातो. याचप्रकारे जे नोकरदार आहेत त्यांच्या पगारातुन प्रत्येक महिन्याला एंप्लॉई प्रोविडेंट फंड(EPF) मधून एका ठराविक रक्कम जमा केली जाते. याद्वारे नोकरदार व्यक्ती हवे असल्यास इनकम टॅक्स वाचवण्याबरोबरच पीपीएफ च्या तुलनेत जादा रिटर्न मिळवू शकतो.

–कुणाला मिळते  EPF ची सुविधा ?

ज्या कंपनीत २० कर्मचार्यांनपेक्षा अधिक कर्मचारी काम करतात त्यांना EPF स्कीम मध्ये समाविष्ट करून घेता येऊ शकते. याचा सरळ अर्थ असा होतो की नोकरी करणाऱ्या व्यक्तींनाच याचा फायदा होतो. EPF मध्ये जेवढी रक्कम कर्मचाऱ्यांकडून फंडात टाकली जाते तेवढीच रक्कम कंपनीकडून जमा केली जाते.

–पोस्ट आणि बँकांमध्ये  PPF खाते उघडले जाते  

तुम्ही ठराविक बँकांमध्ये आणि पोस्टात आपले PPF खाते उघडू शकता. या खात्यात कमीत कमी ५०० रुपये प्रत्येक वर्षाला जमा करावे लागते. या खात्यात, आपल्याकडून जमा केलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत आपणास १.५ लाखांपर्यंतचा  लाभ मिळतो.

–EPF आणि  PPF च्या व्याज दरातील अंतर 

EPF वर आर्थिक वर्ष २०१८ -१९ साठी ८.६५ टक्के व्याज देण्यात येत आहे. तर दुसरीकडे PPF चे व्याज दर सध्या ६ टक्के इतके आहे. जर तुम्ही व्याजासहित इनकम टॅक्सचा लाभ घेणार असाल तर तुम्ही वोलंटरी प्रोविडेंट फंड (VPF) चा उपयोग करून घेऊ शकता.

 –काय आहे वोलंटरी प्रोविडेंट फंड VPF

तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तिथे EPF साठी तुमच्या पगारातही ठराविक रक्कम कापत असते. जर तुम्ही PPF च्या तुलनेत जास्त रिटर्न घेऊ इच्छित असाल तर कंपनीला सांगून तुम्ही EPF खात्यात जादा रक्कम जमा करू शकता. याशिवाय एक्सट्रा रक्कम VPF श्रेणीमध्ये येते. यामध्ये EPF च्या बरोबरीनेच रिटर्न मिळतो. त्याबरोबरच  इनकम टैक्स कपातीचं देखील यात फायदा मिळतो. यात तुम्ही जस्ताची जास्त दिड लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like