नागपुरात सापडले देशातील सर्वात मोठे संत्रे, उंची आणि वजन ऐकून वाटेल आश्चर्य

मुंबई : संपूर्ण जगात नागपुरचे संत्रे प्रसिद्ध आहे. जगभरात होणार्‍या संत्र्यांच्या उत्पादनात भारताचे योगदान खुप मोठे आहे. नागपुरमध्ये देशातील सर्वात मोठे संत्रे मिळाल्याचा दावा ऋतु मल्होत्रा नावाच्या तरूणीने ट्विटरवर केला आहे. तिने संत्र्याचे काही फोटो सुद्धा अकाऊंटवरून शेयर केले आहेत. ऋतुचा दावा आहे की, हे संत्रे तिच्या मित्राच्या फार्मवर आले होते.

संत्र्याची उंची 8 इंच
ऋतुच्या माहितीनुसार या संत्र्याचा आकार 24 इंच रूंद आणि 8 इंच उंच आहे. तर, याचे वजन 1.425 किग्रॅ आहे. तपासात समोर आले की, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये आतापर्यंत सर्वात मोठ्या संत्र्याचा दावा 22 जोनवारी 2006 मध्ये अमेरिकेत करण्यात आला होता. त्या संत्र्याचा आकार 25 इंच होता. हे संत्रे पॅट्रिक फील्डर नावाच्या व्यक्तीच्या बागेत उगवले होते.

संत्र्याचे वजन 1.4 किलोग्रॅम
ऋतुने याची काही छायाचित्रे ट्विटरवर शेयर केली आहेत. ज्यानंतर लोक यावरून खुप मजेशीर कमेंट करत आहेत.