महाराष्ट्राचा ‘चेहरा’ बदलतोय, ‘ग्रहण’ लवकरच सुटणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मी माझ्या पक्षाचे काम करतो. माझ्या पक्षप्रमुखांना खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याविषयी भाजपाला कोणी बोलत नाही. दिल्लीत काय झाले हे मला माहिती नाही. पण महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होईल. महाराष्ट्राचा चेहरा बदलतोय. शपथविधीला लागलेले ग्रहण लवकरच सुटेल, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत सांगितले की, शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढतेय. त्यात अपक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. राज्यात लवकरात लवकर स्थिर आणि मुळात सरकार स्थापन व्हावे, ही शिवसेनेची भूमिका आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करीत आहेत. दिल्लीत काय घडले आणि काय घडू शकते, याची आपल्याला माहिती नाही. भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या अंतर्गत काय चालले आहे, याची माहिती घेण्याची गरज नाही.

शरद पवार यांच्याशी आपले बोलणे झाले असल्याचे सांगून राऊत म्हणाले, त्यांच्या पक्षाचे ५५ आमदार आहे. ते देशाचे, राज्याचे नेते आहेत. त्यांच्याशी का बोलू नये. आम्ही त्यांच्याशी बोलतोय, याचा त्यांना पोटशुळ का उठलाय?, त्यांच्याशी कोण आणि कसे बोलताहेत हे आम्हाला ही माहिती आहे.

भाजपाने वेट अँड वॉच अशी भूमिका घेतली आहे, असे विचारल्यावर राऊत म्हणाले, या शब्दाचा अर्थ समजून घ्या. शपथविधी हा कोणाची मोनोपॉली नाही. शपथविधीला लागलेले ग्रहण सुटेल. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, याचा त्यांनी पुर्नउच्चार केला.

Visit : Policenama.com