देवीपाडा शिवारातील झोपडीत बनावट दारु कारखाना दारुबंदी खात्याने उध्द्वस्त केला.

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील शिरपुर येथील देवीपाडा शिवारातील घरात दारु तयार करण्याचा कारखाना उध्दवत्स केला. लाखोंचा रुपयांचा माल जप्त केला.

सविस्तर माहिती की शिरपुर येथील पाड्यावरील घरात दारु तयार करण्यात येते अशी पक्की खबर खबरीकडुन राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक यांना मिळाली.

मिळलेल्या माहितीच्या आधारे भरारी पथक तयार करुन अधिक्षक यांनी देवीपाडा शिवारातील डोंगरपायथ्याशी असलेल्या झोपडी वजा घरात छापा टाकला असता झोपडीत बेकायदेशीर रित्या देशी दारु तयार करण्याचे कच्चे साहित्य पडलेले होते.यात यंञासह काही खोक्यात बाटलीत बंद केलेली दारु व एक महिंद्रा पिक अप क्रं.एम एच 04 सी यु 7947 या सह एकुण मुद्देमाल 5 लाख 9 हजार 620 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

आयुक्त प्राजक्ता लवंगारे, वर्मा.संचालिका उषा वर्मा, विभागिय उपायुक्त अर्जुन ओहळ, अधिक्षक युवराज राठोड, यांचे मार्गदर्शनाने भरारी पथक प्रभारी निरीक्षक बी आर नवले, डी.के.मेंगाळ, अकुंश सुर्यवंशी, एम.बी.पवार,एस आर नजन, के.एन गायकवाड, डि.एस.देशमुख, जवान शांतीलाल देवरे, गोरख पाटील, भालचंद्र वाघ, केतन जाधव, ए व्ही भडागे, के एम गोसावी, वाहन चालक व्ही.बी.नहिदे, रविंद्र देसले. पथकाने कारवाई केली.

पुढील तपास प्रभारी निरीक्षक बी आर नवले करीत आहे.

 

You might also like