The Family Man 2 मध्ये दिसणार साऊथची ‘ही’ प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेस ! ‘सुपरस्टार’ नागार्जुनची आहे सून

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार मनोज वाजपेयी (Manoj Bajpai) ची वेब सीरिज द फॅमिली मॅन (The Family Man) सीजन 2 बद्दल खूप चर्चा सुरू आहे. या सीरिजचा टीजरही रिलीज झाला आहे. याशिवाय 19 जानेवारी रोजी सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. टीजरमधील खास बात अशी होती की, साऊथ सुपरस्टार सामंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) ची झलक पहायला मिळाली.

या वेब सीरिजमध्ये सामंथाचा खास रोल आहे. सध्या सामंथाच्या लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अशात आता आपण सामंथाच्या करिअरवर एक नजर टाकणार आहोत.

सामंथा अक्किनेनी साऊथमधील पॉप्युलर स्टार आहे. तिनं अनेक अवॉर्ड आजवर तिच्यावर नावावर केले आहेत. सिनेमात येण्यापूर्वीच शिक्षण घेत असताना समंथानं मॉडेलिंग असाईनमेंट सुरू केल्या होत्या.

यानंतर हळूहळू तिला सिनेमाच्या ऑफर्स मिळू लागल्या. . 2010 साली आलेल्या ये माया चेस्वेमधून तिनं अभिनयाला सुरुवात केली होती. यासाठी तिला बेस्ट डेब्यू अ‍ॅकट्रेसचा फिल्म फेअर अवॉर्डही मिळाला होता.

2012 साली आलेल्या नीथाने एन पानवसंथम (Neethaane En Ponvasantham) आणि Eega साठीही तिला अवॉर्ड मिळाला होता. एकाच वर्षात फिल्म फेअर बेस्ट तमिळ अ‍ॅक्टरेस आणि फिल्म फेअर बेस्ट तेलगू अ‍ॅक्ट्रेस असे दोन अवॉर्ड जिंकणारी सामंथा ही दुसरी अ‍ॅक्ट्रेस बनली होती.

यासोबतच सामंथा सिनेमात लिड रोल साकारताना दिसू लागली. तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे. Dookudu (2011), Seethamma Vakitlo Sirimalle Chettu (2012), Attarintiki Daredi (2013), Kaththi (2014) अशा सिनेमात ती झळकली.

2016 मध्ये आलेल्या A Aa या सिनेमासाठी सामंथाला सकारात्मक रिव्ह्युज मिळाले होते. Theri (2016), 24 (2016), Mersal (2017) आणि Rangsthalam (2018) असे तिचे सिनेमेही तिच्या शानदार सिनेमांपैकी एक आहेत.

सामंथाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर सामंथा आणि नागा चैतन्य यांनी 2010 पासून डेटींग करण्यास सुरुवात केली होती. जानेवारी 2017 मध्ये हैदराबादमध्ये दोघांनी साखरपुडा केला. यानंतर ऑक्टोबर 2017 मध्ये ट्रे़डिशन सेरेमनीत त्यांनी गोव्यात लग्न केलं. नागा चैतन्य हा सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा आहे.

सामंथाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा जानू सिनेमा आला आहे. तर एनटीआर 30 आणि काठवाकुला रेंडू काधल येणार आहे. 2010 साली आलेल्या ये माया चेस्वेमधून तिनं अभिनयाला सुरुवात केली होती. यानंतर तिचे प्रत्येक वर्षाला तीन ते चार सिनेमे आले आहेत. एसएस राजामौलीनं डायरेक्ट केलेल्या एगा आणि एआर मुरुगदास डायरेक्टेड कथ्थी असे तिचे प्रमुख सिनेमे आहेत.