‘या’ रिअल लाईफ डाकूकडून आला होता ‘शोले’चा प्रसिद्ध डायलॉग – ‘बेटा सो जा वरना गब्बर आ जाएगा’ !

पोलिसनामा ऑनलाइन –यहां से पचास पचास कोस दूर गावं में जब बच्च रोता है तो मां कहती है, बेटे सो जा…. सो जा.. नहीं तो गब्बर आ जाएगा..’ शोले सिनेमातील अमजद खानचा हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला. सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनेक आया बाळाला झोपवताना हा डायलॉग म्हणत असे.

तुम्हाला माहित आहे का, चंबलच्या ज्या रिअल लाईफ डाकूकडून प्रेरीत होऊन शोलेचा हा डायलॉग लिहण्यात आला त्याचं नाव आहे मोहर सिंह गुर्जर. चंबल घाटीत रॉबिनहूड नावानं फेमस मोहर सिंहचं 92 व्या वर्षी मंगळवारी निधन झालं होतं. दीर्घकाळ तो एका आजाराला सामोरं जात होता. 1982 साली आलेल्या चंबल के डाकू या सिनेमात मोहर सिंहनं काम केलं आहे.

डाकू मोहर सिंह विषयी थोडक्यात…

1960 मध्ये हातात बंदूक घेणाऱ्या मोहर सिंहच्या नावानं चंबल घाटी थरथर कापत असे. तब्बल 12 वर्षे त्यानं खोऱ्यात राज्य केलं. यानंतर 1972 मध्ये त्यानं आत्मसमर्पण केलं. यानंतर तो कुटुंबासोबत शेती करू लागला. त्यानं राजकारणातही नशीब आजमावलं आहे. नगर पंचायत मेहगााच्या अध्यक्षपदी त्याची निवड झाली होती.