भारतातील प्रसिद्ध सट्टेबाज सोनू जलान उर्फ सोनू मालाड पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

भारतातील सट्टेबाजारात प्रसिद्ध असलेल्या सोनू जलान उर्फ सोनू मालाड याला मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादाय गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

सध्या सोनू जलान मुंबईच्या सट्टा बाजारमध्ये मोठा बुकी म्हणून ओळखले जातो. सोनू जलानचे अफगाणिस्तान, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि सौदी अरेबियात ग्राहक आहेत. भारतात, या टोळीचे दिल्ली, कोलकाता, राजस्थान, गुजरात आणि हरियाणात सहकारी आहेत.

कांदिवली (प) मधील शंकर लेन, अग्रवाल रेसिड्न्सीमध्ये वास्तव्यास असेलेल्या जलान याला मुंबई पोलिसांनी क्रिकेट सट्टेबाजीच्या संबंधात अनेक वेळा अटक केली आहे. २०१२ मध्ये सामना निश्चित करण्यासाठी श्रीलंकेच्या एका क्रिकेटपटूला दहा कोटी रुपये दिल्याची कबुली जलान याने मुंबई क्राइम ब्रांचकडे दिली होती. आपल्याला अटक करु नये यासाठी त्याने एका आयपीएस (IPS) अधिका-याला एक कोटी रुपये दिल्याचेही त्याने सांगितले. परंतू या आयपीए अधिका-याचे नाव गुप्त ठेवण्यात आले होते.

त्याची पत्नी शागुफ्ता खान हिच्या खून प्रकरणामध्येही त्याच्याकडे संशयित म्हणून पहिले जाते. सीबीआय ने केलेल्या चौकशीत तो मुंबईतील एका आय पी एस अधिकाऱ्याला मुली पुरवन्याचे काम करीत होता.

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.