…म्हणून ‘त्या’ युवकाचा न्यायालय परिसरातच आत्मदहनाचा प्रयत्न

बिलोली : पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) – कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने शेतकऱ्याने चक्क न्यायालय परिसरातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकर बिलोली येथे घडला आहे. वैजनाथ करडे (बडूर, ता. बिलोली) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, बिलोली तालुक्यापासून अवघ्या ७ कि मी अंतरावर असलेल्या बडूर येथिल साईनाथ करडे  व वैजनाथ करडे या दोन भावांमध्ये काही दिवसापुर्वीच शेतातील पाणी सोडण्याच्या पाईपवरून छोटासा वाद झाला होता. त्या वादामुळे मोठा भाऊ साईनाथ करडे यांनी लहान भावाविरोधात बिलोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे लहान बंधु साईनाथ करडे यांना पोलिसात तक्रार दिल्याचे समजताच त्यांना हे सहन झाले नाही, मला न्याय कोणीही देऊ शकणार नाही म्हणून ते रागाच्या भरात न्यायालय परिसरात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा पोलिस शिपाई माधव पाटील, प्रशांत केसराळीकर, एन.एन. जाधव यांनी कुठलाही विलंब न करता त्या युवकास आपल्या ताब्यात घेतल्याने काही क्षणात होणारी मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेचा अधिक तपास बिलोली पोलीस करत आहेत.