पॉर्न फिल्म दाखवून स्वत: च्या मुलीला तो ‘तसे’ करायला लावायचा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पॉर्न फिल्म दाखवून बापच स्वत:च्या अल्पवयीन मुलीला हस्तमैथून करायला लावत असल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीमध्ये उघडकीस आला आहे. डी. एन. नगर पोलिसांनी बापाला पॉक्सो कायद्यान्वये अटक केली आहे. मुलीने आईकडे वडिलांबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार धक्कादायक उघड झाला आहे. मुलीच्या आईने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी बापाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अवघ्या काही तासात बापाला बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाप त्याच्या १३ वर्षाच्या मुलीसोबत अश्लिल चाळे करत असे. पीडित मुलगी घरामध्ये एकटी असल्यावर त्याचा फायदा घेऊन पॉर्न पाहून तिच्याकडून हस्तमैथून करुन घ्यायचा. पीडित मुलीने ही गोष्ट तिच्या आईला सांगितली. त्यानंतर या महिलेने डी.एन. नगर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी बापाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी बापाला डी.एन.नगर पोलिसांनी रात्री अटक केली.