वडिलांकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन
रात्रीच्या वेळी मुलगी झोपलेली असताना नराधम बापाने जवळीक साधून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

[amazon_link asins=’B07DGTQHJ3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’81ec0529-867e-11e8-8a88-85f179d0958a’]

याप्रकरणी पीडित १७ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. तर मोनुद्दीन गफूर शेख (३५, रा. भोसरी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीवर नराधम बापाने वेळोवेळी अत्याचार केले. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.