भिवंडीतील उजागर डाईंग कंपनीला भीषण आग 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भिवंडीमध्ये सरवली एमआयडीसी परिसरातील उजागर डाईंगला सोमवारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उजागर डाईंगला लागलेल्या भीषण आगीमध्ये 12 ते 13 डाईंग जाळून खाक झाले आहेत. तब्बल ५ ते ६ तासांनंतर ही आग आटोक्यात आली. पहाटेच्या वेळी कंपनीत कोणी नसल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हि आग कशी लागली या बाबद शोध सुरु आहे.
पहाटे लागलेल्या या आगीत कंपनीची तीन मजली इमारत, तेथील यंत्रसामुग्री, कच्चा आणि तयार कपडा असा कोट्यवधींचा माल जळून खाक झाली आहे. आग लागल्याची माहिती उपस्थितांनी स्थानिक पोलीस स्टेशनने भिवंडी आणि कल्याण अग्निशामक दलास दिली. तात्काळ अग्निशामक दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत तळमजल्यावर लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीची उग्रता पाहता इतर कंपन्यांचे नुकसान न होऊ देता कसोशीने प्रयत्न करून यावर नियंत्रण मिळवले.