अंतराळात ‘सर्वप्रथम’ इतिहास घडवणाऱ्या ‘अलेक्सी लिओनोव्ह’ यांचे निधन

मॉस्को : वृत्तसंस्था – 1965 मध्ये प्रथम अंतराळ प्रवास करणारे सोव्हिएतचे अंतराळवीर अलेक्सी लिओनोव्ह यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी मॉस्कोमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते .

लिओनोव्हचा जन्म सायबेरियात झाला होता. त्याचे वडील स्टॅलिनच्या दडपशाहीचे बळी ठरले. 1948 मध्ये, त्याचे कुटुंब पश्चिम रशियामध्ये स्थायिक झाले. अंतराळवीर म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी लिओनोव्हला 1960 साली हवाई दलाच्या पायलट म्हणून निवडले गेले होते. अंतराळात जाणारा पहिला माणूस असलेल्या युरी गागारिनबरोबर त्याला प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली होती.

18 मार्च 1965 रोजी अलेक्सी लिओनोव्ह यांनी पहिला स्पेसवॉक केला. अलेक्सी लिओनोव्ह आपल्या अंतराळ यानातून बाहेर पडला आणि सुमारे 16 फूट लांब केबलच्या मदतीने 12 मिनिटे अंतराळात फिरला. मात्र अंतराळ यानातून बाहेर पडणे जीवावर बेतले होते कारण लिओनोव्हच्या स्पेस सूटचे प्रचंड नुकसान झाले. अंतराळ यानात परत येण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला.

लिओनोव्हच्या पृथ्वीवर सुखरूप परतल्याबद्दल सोव्हिएत रशियामध्ये विजयोत्सव म्हणून साजरा करण्यात आला होता. त्याकाळात अंतराळात अमेरिका आणि रशिया यांच्यात तीव्र स्पर्धा होती. त्यानंतर दहा वर्षांनी , 1975 मध्ये, मेरिका आणि रशियाने प्रथमच संयुक्त मिशनवर काम केले आणि लिओनोव्ह सोयुझ-अपोलो मिशनचा कमांडर बनला.

लिओनोव्ह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को यांनी लिओनोव्हच्या मृत्यूचे ‘ग्रहाचे नुकसान’ असे वर्णन केले आहे. तर रशियाचे अध्यक्ष पुतीन लिओनोव्हचे धैर्य प्रेरणा देते राहील असे म्हंटले आहे.

Visit : Policenama.com