तिहारमध्ये पी चिदंबरम रात्रभर राहिले ‘अस्वस्थ’, खाल्ली ‘चपाती – भाजी’ !

नवी दिल्ली वृत्तसंस्था – पी. चिदंबरम हे एकेकाळी देशाचे अर्थमंत्री होते, आज तिहारला तुरूंगात डांबले गेले आहे. काल तिहार तुरूंगात त्यांची पहिली रात्र होती. यादरम्यान ते अस्वस्थ दिसत होता. चिदंबरम रात्रभर झोपले नाही. रात्रीच्या वेळी अनेकदा ते आपल्या गादीवरुन उठले आणि तुरूंगात चालत राहिले. बराच वेळ चालल्यानंतर ते पुन्हा आपल्या जागी जाऊन बसले. सूत्रांच्या माहितीनुसार, चिदंबरम रात्रभर अस्वस्थ दिसत होते. आयएनएक्स मीडिया प्रकरणातील आरोपी असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तिहार कारागृह सातच्या कक्ष क्रमांक 15 मध्ये ठेवले आहे. 19 सप्टेंबरपर्यंत कारागृहात त्यांचा मुक्काम असेल.

तुरुंगात खावे लागले रात्रीचे जेवण
तिहारमध्ये कैद्यांना डाळ वाटी, एक भाजी आणि 4-5 चपात्या  दिल्या जातात. रात्रीच्या जेवणादरम्यान त्यांना रोटी, डाळ आणि भात देण्यात आल्याचे सांगण्यात आले. कारागृह नियमानुसार त्यांना सकाळी सात ते 8 वाजता नाष्टा देण्यात येईल. रात्री 12 वाजता जेवण आणि 4 वाजता चहा तसेच रात्री 7 ते 8च्या दरम्यान रात्रीचे जेवण दिले जाईल. त्यांना दिवसा दीड तास टीव्ही पाहण्याची परवानगी आहे.

अंडरट्रायल कैद्यांसारखीच मिळणार वागणूक
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना इतर खटल्यातील कैद्यांप्रमाणेच वागवले जाईल. चिदंबरम यांना कोर्टाचा आदेश आणि तुरूंग मॅन्युअल व्यतिरिक्त कोणतीही सुविधा दिली जाणार नाही. नियमावलीनुसार चिदंबरम यांना सकाळी 6 ते 7 या वेळेत उठावे लागणार आहे. न्याहारीसाठी चहा आणि बिस्किटे किंवा ब्रेड दिले जाऊ शकतात. न्याहारीनंतर त्यांना चालून व्यायाम करावा लागतो.