देशात उघडतंय पहिलं ‘ऑनलाइन’ उधारीची दुकान, ग्राहकांना ‘आता खरेदी करा अन् पेमेंट नंतर द्या’ची मिळणार सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फिनटेक कंपनी मुद्राविक फिनटेक क्रेडिटकार्ट फिनकॉम नावाने देशात एक असा प्लॅटफॉर्म आणत आहे, जे पहिले ऑनलाइन उधारीचे दुकान असेल आणि २८ ऑगस्टपासून त्याची सुरू होईल. कंपनीने आज एका निवेदनात म्हटले की, २८ ऑगस्टपासून हे दुकान सुरु होईल. देशातील टियर २,३,४ आणि ५ शहरांमधील ग्राहकांना आता खरेदी करा, नंतर पैसे द्या अशी सुविधा मिळणार आहे. ते व्याज किंवा प्रक्रिया शुल्काशिवाय खरेदी करू शकतात. ते म्हणाले की, आर्थिक दृष्टीने फिनकॉम म्हणजे कॉमर्स आणि फायनान्स यांचे संयोजन खूप आवश्यक झाले आहे. यामुळे वेग आणि आरामदायक असे दोन्ही अनुभव येतात. ज्यामुळे ग्राहकांना थेट कर्ज घेण्याची सुविधा मिळेल.

यामुळे ते देय द्यायच्या प्रक्रियेपासून वाचतील, तसेच त्यांना त्यांच्या बँक ठेव आणि इतर वित्तीय संस्थांवर अवलंबून राहावे लागणार नाही. ते म्हणाले की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर भारतीय उत्पादक आणि ग्राहक एकाच लिंकद्वारे जोडले जातील. हे स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देईल, तसेच जेव्हा ग्राहक वेबसाइटवर साइन अप करतील, तेव्हा त्यांना आता खरेदी करा, नंतर पैसे द्या असा पर्याय मिळेल. त्यात शून्य टक्के व्याज दर असेल. कोणतेही डाउन पेमेंट किंवा प्रक्रिया शुल्क लागणार नाही. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत त्यांना आता या प्लॅटफॉर्मवरुन सहज खरेदी करता येईल. या प्लॅटफॉर्मवर कपडे, फुटवेअर, बॅग, विविध वस्तू, घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी उपलब्ध असेल आणि देशातील २६ हजाराहून अधिक पिन कोडवर वस्तू डिलिव्हर केल्या जातील.