वजन माप संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्हा वजन माप संघटनेच्या वतीने पहिले राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन पुण्यातील स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. गुरुवारी ( दि.२१) सकाळी १०:०० वा. अधिवेशनाचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे वैध मापन शास्राचे नियंत्रक संदीप बिश्नोई तसेच नवी दिल्ली येथील वैध मापन शास्राचे संचालक बी.एन.दीक्षित उपस्थित राहणार आहेत.

या अधिवेशनात वजनमाप परवानाधारकांना येणाऱ्या अडचणी व नवीन येणाऱ्या GATC संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगवले यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष विजय गायकवाड करणार असून सर्व परवाना धारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.