‘नाईट स्कूल’मध्ये पहिला आलेल्या आकाश ला व्हायचंय ‘सीएस’

पुणे पोलीसनामा ऑनलाइन :
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील घिसरगाव येथील आकाश पंढरीनाथ धिंडले हा विद्यार्थी पुण्यात येऊन एका दुकानात दिवसभर काम करून पूना नाईट हायस्कुलमध्ये रात्र शाळेत बारावीच्या परीक्षेत 79 टक्के गुण मिळवून पहिला आला आहे. पहिला आल्यानंतर त्याने आता त्याला सीएस व्हायची ईच्छा व्यक्त केली आहे.

वेल्हा तालुक्यातील घिसरगाव येथे राहणारा आकाश पंढरीनाथ धिंडले या विद्यार्थ्याला दहावीच्या परिक्षेत्त 81 टक्के गुण मिळाले. पुढे शिक्षण घेण्याची इच्छा होती. मात्र आई वडील गावी साडे चार एकर जमीनीमध्ये भात आणि नाचणी चे पीक घेतात. या शेतीमधून अधिक उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे गावी शेतीच्या उत्पन्नावर शिक्षण घेणे अशक्य होते. काही करून पुढे शिक्षण घेण्याचा निश्चय केला. त्यासाठी पुण्यात काम करून शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. पुण्यात आल्यावर तुळशीबागेत कॉस्मेटिकच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. पूना नाईट हायसकूलमध्ये काम करून शिक्षण घेता येते, याची माहिती मिळाल्यावर चौकशी केली आणि प्रवेश घेतला. 11 वी कॉमर्समध्ये मागील वर्षी प्रवेश घेतला. या वर्षी बारावीच्या परीक्षेत त्याला 79 टक्के गुण मिळाले आहे. आता यापुढे सीएस होण्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले. तर या मागील दोन वर्षांच्या काळात जिथे काम करीत होता तेथील मालक, कर्मचारी वर्गाने खूप सहकार्य केल्याने शिक्षण घेता आल्याची भावना त्याने व्यक्त केली.