‘हे’ आहेत जगातील सर्वात ‘सुंदर’ आणि ‘अलिशान’ 5 ‘एअरपोर्ट’, ज्यांना पाहून सर्व म्हणतात ‘जन्नत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सहसा रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावर थांबणे खूप कंटाळवाणं आणि कठीण वाटते. परंतु आज आपण जगातील अशा काही विमानतळांबद्दल जाणून घेणार आहोत की ज्यांना सर्वात सुंदर म्हटले जाते. ही अशी विमानतळ आहेत जेथे एखादी फ्लाइट उशिरा येत असल्याने काही काळ थांबावे जरी लागले तरीही कोणत्याच प्रवाशाला वाईट वाटणार नाही.

१. सुरुवात इंचियॉन आंतरराष्ट्रीय विमानतळापासून करूयात, ज्यामध्ये दोन सिनेमाहॉल, म्युजिअम आणि फिरण्यासाठी छान गार्डन आहे, तसेच आइस-स्केटिंग पार्क सुद्धा आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की, हे विमानतळाव्यतिरिक्त एक सुंदर मॉल देखील आहे.

२. तसेच सिंगापूर मधील चांगी विमानतळ देखील अनेकांना भुरळ घालते. हे विमानतळ गार्डन्स, धबधबे आणि छोट्या कालव्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. चांगी विमानतळावरच जगातील सर्वात लांब विमानतळ स्लाइड आहे. तसेच इथे अनेक थीम पार्क सुद्धा आहेत जसे की लॉर्ड्स ऑफ रिंग्ज आणि द हॉबिट.

३. हॉंगकॉंग विमानातळ देखील जगातील सर्वात आलिशान विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावर आयमॅक्स सिनेमाहॉल देखील आहेत.

४. मलेशिया येथील क्वालालंपूर विमानतळ देखील खूप सुंदर आहे. काँक्रीटच्या खूप साऱ्या इमारती पाहण्याऐवजी याच्यामध्ये लोकांना हिरवळ पण दिसते. जे कि विमानतळाला अजून सुंदर बनवते.

५. लास वेगास मधील मॅककारन आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या मूर्तिकला आणि भित्तिचित्रांसाठी प्रख्यात आहे. प्रवासी येथे रिकाम्या वेळेत गेमलिंग देखील करू शकतात.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/