पुणे पाेलिसांनी अटक केलेल्या ‘त्या ‘पाचही जणांचे काश्मीरी फुटीरवाद्यांशी संबंध

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन 

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेला माओवाद्यांकडून पैसा पुरवला गेला असून या परिषदेमधून नागरिकांना भडकवण्याचा प्रयत्न होता अशी माहीती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे  यांनी पत्रकार परिषदेत दिली. बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असलेल्या संशयावरुन पुणे पोलिसांनी मंगळवारी देशभरातील ९ ठिकाणी घातलेल्या छाप्यात पाच जणांना अटक केली होती. तसेच या पाचही जणांचा काश्मिरी फुटीरवाद्यांशी संबंध असल्याचे पुरावे पोलिसांकडे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
[amazon_link asins=’B01N0WVC16,B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’84553d42-ab8c-11e8-93aa-1b26ff441c1b’]

अटक करण्यात आलेल्यांचा नक्षलवाद्याशी संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. सीपीआय माओवादीकडून एल्गार परिषदेला पैशांचा पुरवठा करण्यात आला असून परिषदेमार्फत जनतेला भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ही उपायुक्त सरदेशपांडे यांनी सांगितलं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवरा राव यांना पाच  सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने  दिले आहेत.

पुणे पोलिसांनी ९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून यावेळी पेन ड्राईव्ह, कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत विविध पुरावे हाती लागले असून तपासात ई-मेल्स, पत्र असे भक्कम पुरावे हाती लागले आहेत. एल्गार परिषदेच्या आडून शासनाविरोधात जनतेला भडकवण्याचे नियोजन होते याचेही पुरावे हाती आले आहेत असं पोलिसांनी सांगितलं.
[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8acb9975-ab8c-11e8-85b5-fb4940752c94′]

यावेळी पोलिसांनी आरोपी वरावर राव हा नेपाळमधून शस्त्र विकत घ्यायचा अशी माहिती मिळाली आहे.  एल्गार परिषदेच्या आयोजन प्रकरणी गुन्हा दाखल आहे, या प्रकरणी, माओवादी संबंधाचे पुरावे मिळाले आहेत. अटक करण्यात आलेल्यांकडे पत्र, मेलसह, पेनड्राईव्ह असे अनेक महत्वाचे पुरावे मिळाले असून कबीर कला मंच, सीपीआई माओवादी कडून निधी पुरवला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यामध्ये सरकार विरोधात कृत्य करण्याचे पुरावे आढळले आहेत.

पुणे पोलिसांनी अटक केलेल्या ‘त्या’ पाच जणांना नजरकैदेत ठेवण्याचे सुप्रिम कोर्टाचे आदेश

पुण्यात एल्गार परिषदेत बंदी असलेल्या माओवादी संघटनेच्या कटात या पाच आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट पुरावे हाती लागले आहेत. युवकांना भडकवणे शस्ञास्त्रे जमा करुन दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झालं आहे. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांचा घातापाताचा कट असल्याचेही समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्यांकडून लॅपटॉप हार्डडिस्कसह अनेक  साहित्य व पुरावे  मिळाले आहेत. तसेच कबीर कला मंचला देखील पैसे पुरवले असून देशातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची तयारी सुरू केली असल्याचे तपासात पुढं आल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिरिष सरदेशपांडे यांनी दिली.

सुधा भारद्वाज यांच्या रिमांडवर पुणे पोलिसांना झटका