आता येणार अत्याधुनिक ड्रोन; गरजेनुसार बदलणार आपला आकार

जिनिव्हा : वृत्तसंस्था: आता असे अत्याधुनिक ड्रोन बनवण्यात आले आहेत ज्याचे पंख दुमडता येऊ शकतात. हवेत उडत असताना . अगदी अरूंद, चिंचोळ्या जागेतूनही ते पंख दुमडून सहजपणे बाहेर उडत येऊ शकतात इतकेच नाही तर  मोकळ्या जागेत पुन्हा पंख पसरून उडू शकतात. हे ड्रोन अगदी पक्ष्यांसारखेच आपले पंख गरजेनुसार दुमडू किंवा पसरवू शकतात ही या ड्रोनची खासियत आहे. जागेच्या तुलनेने त्याला आपला आकार सहज बदलता येऊ शकणारे असे हे अत्याधुनिक ड्रोन आहेत. स्वित्झर्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ ज्युरिख अँड ईपीएफएलच्या संशोधकांनी करून हे असे अनोखे फोल्डेबल ड्रोन बनवले आहेत.
ड्रोनची वैशिष्ट्ये 
या ड्रोनची खासियत अशी की,  त्याचा कॅमेरा ऑब्जेक्टच्या जवळ जाणार असेल तर ड्रोनचा आकार इंग्रजी ‘टी’सारखा होतो. तर दुसरीकडे  हे ड्रोन इंग्रजी ‘एक्स’ अक्षरासारखे असेल ज्याचे सर्व पंख पसरलेले असतात; पण गरजेनुसार ते आपला आकार बदलू शकते. पंख दुमडले की त्याचा आकार इंग्रजी ‘एच’ सारखा होतो. अशा प्रकारे या ड्रोनची वैशिष्ट्ये आहेत.
ड्रोनचा उपयोग 
अनेकदा आपल्याला भूंकपासाख्या अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या फोल्डेबल ड्रोनचा वापर नैसर्गिक आपत्तीवेळी चांगल्याप्रकारे होऊ शकतो. कारण भूकंपाच्या वेळी मोठमोठे ढिगारे तयार होतात तसेच काही चिंचोळया किंवा अरूंद जागाही तयार होतात. अशा परिस्थितीत सर्वसाधारण ड्रोन किंवा माणसाला तिथे पोहोचता येत नाही दरम्यान हे अत्याधुनिक ड्रोन अशा अरूंद ठिकाणी सहज जाऊ शकतात. अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीच्या काळात अशा प्रकारचे अत्याधुनिक ड्रोन खूपच उपयोगी ठरणार आहेत हे मात्र नक्की. अशा ड्रोनचा उपयोग लोकहितासाठीच व्हावा एवढे अपेक्षित आहे.
Loading...
You might also like