…’या’ माजी खासदारांनी शिवबंधन बांधून सोडली राष्ट्रवादीची साथ

मुंबई ; पोलीसनामा ऑनलाईन : राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत निवेदिता माने यांनी शिवबंधन हातावर बांधले. याआधी त्यांच्या मुलानेही शिवसेनेत प्रवेश केला. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निवेदिता माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. निवेदिता माने या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आहेत. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्राचा गड जिंकला असं म्हणणं वावगं ठरणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांच्याशी जवळीक साधल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. 28 नोव्हेंबर रोजी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील माने कुटुंबाची नाळ ही गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळलेली होती. पण हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे स्वाभिमानीला म्हणजेच राजू शेट्टींना पाठिंबा देणार असल्यानं माने कुटुंब नाराज होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, रुकडी, इचलकरंजी भागात माने कुटुंबाचा दांडगा जनसंपर्क आहे. धैर्यशील माने यांच्या आई निवेदिता माने यांनी यापूर्वी दोनदा हातकणंगले मतदारसंघात खासदारपद भूषवलं
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने आणि त्यांचे पुत्र धैर्यशील यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडलेली नाळ तुटली आहे. माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा सेनाप्रवेश म्हणजे  राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे .  स्वतः निवेदिता माने सुद्धा या सुद्धा सेनेत प्रवेश करणार आहेत
का केला शिवसेना प्रवेश ? 
काही दिवसांपूर्वी  हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे स्वाभिमानीला म्हणजेच राजू शेट्टींना पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. माने कुटुंब याच गोष्टीवरून नाराज असल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, रुकडी, इचलकरंजी भागात माने कुटुंबाचा दांडगा जनसंपर्क आहे. धैर्यशील माने यांच्या आई निवेदिता माने यांनी यापूर्वी दोनदा हातकणंगले मतदारसंघात खासदारपद भूषवलं आहे.
‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश 
गेल्या अनेक वर्षांपासून हे कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होतं. पण हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टींचं वाढतं प्रस्थ लक्षात घेऊन माजी खासदार निवेदीता माने आणि त्यांच्या मुलगा धैर्यशील माने यांनी आज मुंबईत येऊन  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश घेतला.
दोघांच्या या शिवसेना प्रवेशामुळे कोल्हापुरात राष्ट्रवादीला  मोठा धक्का बसला असला आहे. शिवसेना प्रवेशानंतर आता हातकणंगले मतदारसंघात निवेदीता माने आणि धैर्यशील माने राष्ट्रवादीच्या विरोधात उभे राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. माजी खासदार निवेदीता माने या राष्ट्रवादी पक्षाच्या माजी राष्ट्रीय महिला अध्यक्षा  सुद्धा राहिल्या आहेत. दरम्यान याचे पडसाद कसे  उमटतील यांकडे सर्व पक्षाचं लक्ष असणार आहे.